Thursday, April 15, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Maharashtra Mini Lockdown: सोमवारपासून काय सुरू, काय बंद?; जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra Mini Lockdown: सोमवारपासून काय सुरू, काय बंद?; जाणून घ्या एका क्लिकवर

Related Story

- Advertisement -

राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. यामुळे राज्य सरकारची झोप उडाली आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयातील बेड्सची कमतरता अधिक भासू लागली आहे. यामुळे अखेर राज्यात उद्यापासून मिनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. तर विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याबाबतची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

उद्यापासून रात्री ८ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी असणार असून दिवसा जमावबंदी असणार आहे. तर विकेंडला शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून लॉकडाऊन सुरू होईल. तो सोमवारी सकाळी संपेल. दर आठवड्याला शनिवार आणि रविवारी राज्यात कडकडीत बंद असणार असून यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. ३० एप्रिलपर्यंत मिनी लॉकडाऊन आणि विकेंड लॉकडाऊन असणार आहे.

- Advertisement -

काल ४ एप्रिल रोजी ब्रेक दि चेनच्या आदेशात ज्या आवश्यक सेवाच उल्लेख होता, त्यात आणखी काही सेवांचा समावेश आज राज्य सरकारने केला आहे. त्या संदर्भातील आदेश आज प्रसिद्ध करण्यात आले .
आता या सेवा देखील आवश्यक सेवा ( Essential Services) मध्ये येतील:

१. पेट्रोल पंप, आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने
२. सर्व प्रकारच्या कार्गो सेवा
३. डेटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर्स, आयटी – माहिती तंत्रज्ञान सबंधित महत्वाच्या पायाभूत सुविधा आणि सेवा
४. शासकीय व खासगी सुरक्षा सेवा
५. फळविक्रेते

उद्यापासून काय बंद, काय सुरू?

 • सार्वजनिक वाहतूक सेवा ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार
 • मॉल्स, हॉटेल्स बंद
 • अत्यावश्यक सेवा सुरू राहणार
 • सिनेमागृह आणि नाट्यगृह बंद राहणार
 • खेळ्याची मैदाने आणि उद्याने बंद राहणार
 • बस, मुंबई लोकलमध्ये आसन क्षमतेनुसारच प्रवास करता येणार
 • रेस्टॉरंटमध्ये केवळ पार्सल सेवा सुरू राहणार
 • गृहनिर्माण क्षेत्रातील सर्व कामे सुरू राहणार
 • ‘वर्क फ्रॉम होम’ करण्यावर अधिक भर दिला जाणार
 • रिक्षामध्ये चालक आणि दोन प्रवाशांनाच परवानगी
 • विकेंड लॉकडाऊनच्या काळात गार्डन, चौपाट्या, धार्मिक स्थळे बंद
 • विकेंड लॉकडाऊनमध्ये धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांवर बंदी
 • सरकारी कार्यालय ५० टक्के क्षमतेने काम करणार
 • इंडस्ट्री सुरू राहणार, कामगारांवर कुठलेही निर्बंध नाहीत
 • सर्व ट्रान्सपोर्ट व्यवस्था सुरु राहणार
 • मास्क घालणे बंधनकारक
 • सरकारी ठेके असलेली कामे सुरु राहणार
 • भाजी मार्केवर कुठलेही निर्बंध नाहीत, फक्त गर्दी कमी करण्याकरिता कठोर नियम असतील.
 • शूटिंगला गर्दी होणार नाही अशा ठिकाणी परवानगी दिली जाणार

- Advertisement -

हेही वाचा – राज्यात विकेंडला कडक Lockdown, सार्वजनिक वाहतूकीवर पालकमंत्र्यांचे


 

- Advertisement -