घरदेश-विदेशLive Update : संसदेतील विरोधी पक्षाच्या 146 खासदारांचे निलंबन रद्द

Live Update : संसदेतील विरोधी पक्षाच्या 146 खासदारांचे निलंबन रद्द

Subscribe

संसदेतील विरोधी पक्षाच्या 146 खासदारांचे निलंबन रद्द

उद्यापासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निलंबित खासदारांना सहभागी होता येणार

- Advertisement -

माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांच्या सूनेचा रस्ते अपघातात मृत्यू

जसवंत सिंह यांचा मुलगा मानवेंद्र अपघातात गंभीर जखमी

- Advertisement -

मविआच्या आजच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय – संजय राऊत

2 फेब्रुवारीच्या बैठकीला प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार

वंचितचे नेते बैठकीत चर्चेसाठी उपस्थित होते, संजय राऊतांची माहिती

आघाडीमध्ये आम्हाला नवीन मित्र मिळाले – संजय राऊत


किशोरी पेडणेकर यांची ईडी कार्यालयात 7 तास चौकशी

पेडणेकर सात तासानंतर आल्या बाहेर

यंत्रणांना सहकार्य करणे आमचे काम – पेडणेकर


महाविकास आघाडीत वंचितला देण्यात आले अधिकृत स्थान

मविआचे प्रकाश आंबेडकरांना समावेशाचे पत्र


अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा


संभाजीनगरात एमआयएम आणि ठेवीदार आक्रमक

आदर्श बँकेतील हजारो ठेवीदारांची फसवणूक झाल्याने ठेवीदार आक्रमक

बॅरीकेट तोडून ठेवीदार विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात घुसले


मुख्यमंत्री हेमंत सोरेन रांचीत दाखल

झारखंडचे मुखमंत्री हेमंत सोरेन मंगळवारी तब्बल 40 तासांनंतर रांची येथे पोहचले आहेत


उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी घेतली वडेट्टीवारांची भेट

राजकीय चर्चांना उधाण

रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथून सामंत लढण्यास इच्छूक


नारायण राणेंनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

सह्याद्री अतिथी गृहावर दोघांची भेट

भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट


मनोज जरांगे पाटील रायगडावर दाखल

जरांगे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेणार


पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना दहा वर्षांचा तुरुंगवास

माजी पंतप्रधान इम्रान खान आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांना मंगळवारी सायफर प्रकरणात 10 वर्षांच्या

तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली


चंदीगडमध्ये भाजपाचाच महापौर

इंडिया आघाडीला धक्का, विनोद तावडेंची खेळी यशस्वी


उद्या मंत्रिमंडळाची बैठक

उद्या बुधवारी रोजी दुपारी बारा वाजता मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे


प्रतिज्ञापत्रांनुसार शरद पवारांकडेच बहुमत -जेठयानी

शरद पवार गटाच्या वकिलांचा अंतिम युक्तिवाद सुरू


राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात

दोन्ही गटाचे आमदार सुनावणीला हजर

विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सुनावणी सुरू


किशोरी पेडणेकर, संदीप राऊत ईडी कार्यालयात दाखल

कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी पेडणकरांची

तर खिचडी घोटाळ्याप्रकरणी संदीप राऊत यांची चौकशी


पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राष्ट्रपिता महात्मा गांधींना अभिवादन

राजघाटावर जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांना अभिवादन केलं

यावेळी त्यांच्यासोबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग होते


लॅंड फॉर जॉब प्रकरणी आज बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची आज ईडी चौकशी

काल याच प्रकरणी लालू प्रसाद यादव यांची 10 तास चौकशी झाली


संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

अधिवेशन शांततेत चालविण्याबाबत राजकीय पक्षांशी चर्चा होण्याची शक्यता


मनसेमध्ये आज विविध पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश

आज सकाळी 10.30 वाजता शिवतीर्थ येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थिती विविध

पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश पार पडणार आहे


संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून होणार सुरु

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या बुधवारपासून सुरु होत आहे

गुरुवारी अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करणार आहेत

उद्या सकाळी 11 वाजता राष्ट्रपती दोन्ही सभागृहातील सदस्यांना संबोधित करतील


मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर मंगळवारी दोन तासांचा ब्लॉक

दुरुस्तीच्या कामाुळे पुन्हा एकदा मेगा ब्लॉक


मनोज जरांगे पाटील आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेणार

आंदोलन स्थगित केल्यानंतर मनोज जरांगे पाटील आज छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेणार


आजपासून ठाकरे गटाची मातृतीर्थ ते शिवतीर्थ पदयात्रा

माँसाहेब जिजाऊंच्या (सिंदखेड राजा, बुलढाणा) पासून यात्रेला सुरुवात

3 मार्च रोजी मुंबईतील शिवतीर्थावर समारोप


भारत जोडो न्याय यात्रेचा बिहारमध्ये आजचा दुसरा दिवस

काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज बिहारमध्ये दुसरा दिवस आहे

बिहारमधील राजकीय उलथापालथीनंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे पहिल्यांदाच बिहारमध्ये दाखल झाले आहेत


महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज मुंबईत बैठक

आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर चर्चा होण्याची शक्यता


ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांची आज ईडी चौकशी

कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळ्या प्रकरणी

आज ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांची ईडी चौकशी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -