घरमहाराष्ट्रनिवासी डॉक्टरांनी संप मागे घ्यावा, 15 दिवसांची मुदत मागत वैद्यकीय मंत्र्यांचे आवाहन

निवासी डॉक्टरांनी संप मागे घ्यावा, 15 दिवसांची मुदत मागत वैद्यकीय मंत्र्यांचे आवाहन

Subscribe

राज्यभरातील निवासी डॉक्टरांच्या विविध मागण्यासाठी आज ‘मार्ड’ संघटनेने संपाचं हत्यार उपसलं आहे. यामुळे राज्यभरातील सरकारी रुग्णालयातील हजारो डॉक्टर आज संपावर आहेत. मुंबई, पुण्यासह अनेक शहरांमधील डॉक्टरांनी काम बंद करत संपात सहभाग घेतला आहे. महाराष्ट्रातील सर्व शासकीय व महापालिका महाविद्यालय व रुग्णालयाच्या आवारात निवासी डॉक्टरांचा हा संप सुरु आहे. मात्र संपामुळे आरोग्य व्यवस्थेवर परिणाम जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी निवासी डॉक्टरांना संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच निवासी डॉक्टरांनी त्यांच्या मागण्यांसंदर्भात 15 दिवसांचा वेळ द्या, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

निवासी डॉक्टरांच्या मागण्यांसंदर्भात  15 दिवसांत निर्णय घेऊ 

निवासी डॉक्टरांच्या संपावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, निवासी डॉक्टरांनी आपला संप मागे घ्यावा. निवासी डॉक्टरांच्या महागाई भत्ताबाबतचं प्रकरण वित्त विभागाकडे प्रलंबित आहे, त्याबाबत आमचा वित्त विभागाकडे पाठपुरावा सुरु आहे. 15 दिवसांत त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात निर्णय घेऊ.

- Advertisement -

डॉक्टरांच्या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक 

डॉक्टरांनी संपाची आग्रही भूमिका घेणं चुकीच आहे. निवासी डॉक्टरांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून मी स्वत: सकारात्मक आहे. त्यांच्या प्रश्नांची पूर्ण जाणीव आहे. निवासी डॉक्टर कसे राहतात, त्यांच्या सगळ्या अडचणींची कल्पना आहे, असंही गिरीश महाजन म्हणाले.

लवकरचं निवासी डॉक्टरांच्या हॉस्टेलची डागडुजी करुन घेऊ

संप बाहेरच्या बाहेर मिटल्यास बरं असतं. संप करायचा म्हणून करायचा असं होता कामा नये. सगळ्या गोष्टी आत्ताच्या आत्ता करा अशी जर मागणी असेल तर तसं होणार नाही. सगळ्या गोष्टी पूर्ण होतात, पण त्या नियमाने होतील. यावेळी काही मागण्या तात्काळ मंजूर करू असं आश्वासन गिरीश महाजन यांनी दिलं आहे. केंद्राकडे 500 कोटींसाठी पाठपुरावा करत आहे. तर डॉक्टरांच्या हॉस्टेलच्या डागडुजीला पीडब्यूडीकडे 1200 कोटी दिले आहेत. 4 – 8 दिवसांत त्याचे टेंडर निघेल आणि लवकरचं हॉस्टेलची डागडुजी करुन घेऊ असही महाजन म्हणाले.

- Advertisement -

निवासी डॉक्टरांवर कारवाईबाबत कोणताही भूमिका नाही

डॉक्टारांनी माझ्याशी येऊन बोललं पाहिजे होतं, त्यांच्या काही अडचणी असतील तर त्यांनी थेट माझ्याशी येऊन बोलाव्यात, असं आवाहन त्यांना मी मागे पण केलं होते. संपकरी निवासी डॉक्टरांवर कारवाईबाबत कोणताही भूमिका नाही, कारण ते आपलेच डॉक्टर आहेत, त्यांच्याबद्दल मला सहानुभूती आहे. पण उगीच टोकाची भूमिका घेऊ नका, मात्र त्यांनी समजून घेतलं पाहिजे. थेट चर्चा करुन प्रश्न सोडवा, असं आवाहनही गिरीश महाजन यांनी केले आहे.


महाराष्ट्रातील महसूल विभागाचा असाही विक्रम; ‘या’मध्ये मिळवला पहिला क्रमांक

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -