Maharashtra Corona Update: राज्यात निर्बंध पहिल्याच दिवशी असरदार! कोरोना रुग्णसंख्येत ११ हजारांची घट

राज्यात आज दिवसभरात ३१ नवे ओमिक्रॉनबाधित आढळले आहेत. राज्यातील एकूण ओमिक्रॉनबाधितांची संख्या १ हजार २४७वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत ४६७ जणांचा मृत्यू झाला आहे.

maharashtra mini lockdown 33,470 new corona patient found and 8 death in 24 hours
Maharashtra Corona Update: राज्यात निर्बंध पहिल्याच दिवशी असरदार! कोरोना रुग्णसंख्येत ११ हजारांची घट

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे आजपासून राज्य सरकारने दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी लागू केली. या काळात अत्यावश्यक सेवेशिवाय कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. राज्यातील महाविद्यालये आणि शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार, अशाप्रकारे अनेक गोष्टींवर पुन्हा निर्बंध लावत राज्य सरकारने नवीन आदेश जारी केले. राज्यातील निर्बंध पहिल्याच दिवशी असरदार दिसून आले. कारण आज राज्यात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत तब्बल ११ हजारांनी अशी मोठी घट झाली. राज्यात आज ३३ हजार ४७० नव्या कोरोनाबाधितांची भर पडली असून ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २९ हजार ६७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात २ लाख ६ हजार ४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

काल, रविवारी राज्यात ४४ हजार ३८८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत ११ हजार ९१८ रुग्णांची घट होऊन ३३ हजार ४७० रुग्णांची नोंद झाली आहेत. त्यामुळे राज्यातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६९ लाख ५३ हजार ५१४वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ४१ हजार ६४७ जणांचा मृत्यू झाला असून ६६ लाख २ हजार १०३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९५ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०३ टक्क्यांवर गेला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७ कोटी ७ लाख १८ हजार ९११ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६९ लाख ५३ हजार ५१४ (९.८३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात १२ लाख ४६ हजार ७२९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २ हजार ५०५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

ओमिक्रॉनची परिस्थिती?

राज्यात आज दिवसभरात ३१ नवे ओमिक्रॉनबाधित आढळले आहेत. आज राज्यात पुणे मनपामध्ये २८, पुणे ग्रामीणमध्ये २, पिंपरी चिंचवडमध्ये १ ओमिक्रॉनबाधितांची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण ओमिक्रॉनबाधितांची संख्या १ हजार २४७वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत ४६७ जणांचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – Mumbai Corona Update: मुंबईकरांना दिलासा! नव्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येत मोठी घट