घरताज्या घडामोडी'आमच्यामध्ये काय हिंमत आहे हे आम्ही...', शंभुराज देसाईंचा संजय राऊतांवर हल्लाबोल

‘आमच्यामध्ये काय हिंमत आहे हे आम्ही…’, शंभुराज देसाईंचा संजय राऊतांवर हल्लाबोल

Subscribe

आमच्यामध्ये काय हिंमत आहे हे संजय राऊत यांना आम्ही बाळासाहेबांची शिवसेना म्हणून 5 महिन्यांपूर्वीच दाखवून दिलेले आहे. त्यामुळे आमच्या किती हिंमत आणि ताकद आहे याचा संजय राऊत यांनी अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे आमच्या बाबतीत त्यांनी बोलू नयेच.

आमच्यामध्ये काय हिंमत आहे हे संजय राऊत यांना आम्ही बाळासाहेबांची शिवसेना म्हणून 5 महिन्यांपूर्वीच दाखवून दिलेले आहे. त्यामुळे आमच्या किती हिंमत आणि ताकद आहे याचा संजय राऊत यांनी अनुभव घेतलेला आहे, अशा शब्दांत मंत्री शंभुराज देसाई यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. (Maharashtra Minister Shambhuraj Desai Criticized Thackeray Group MP Sanjay Raut)

“आमच्यामध्ये काय हिंमत आहे हे संजय राऊत यांना आम्ही बाळासाहेबांची शिवसेना म्हणून 5 महिन्यांपूर्वीच दाखवून दिलेले आहे. त्यामुळे आमच्या किती हिंमत आणि ताकद आहे याचा संजय राऊत यांनी अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे आमच्या बाबतीत त्यांनी बोलू नयेच. तसेच, भाजपा आणि शिंदे गटाचे जे सरकार राज्यात आहे, हे सरकार राज्यातील मराठी भाषिकांची सीमेच्या भागातील मराठी भाषिक नागरिकांच्या समस्या काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी आम्ही तिकडे जात आहोत. त्यामुळे कुणाच्यात किती धमक आहे, आणि कुणाच्यात नाही हे बोलण्यापेक्षा २०२०पासून सीमाभागातील मराठी भाषिक नागरिकांच्या सवलती, त्यांना राज्याकडून केली जाणारी मदत जी थांबली होती. ती या सरकारने सुरू केली. तुम्ही केवळ बोलता आणि आम्ही पूर्ण करतो”, अशी टीका शंभुराज देसाईंनी केली.

- Advertisement -

काय म्हणाले होते संजय राऊत?

“अरे आरे वाल्यानो आणि कारे वाल्यांनो कर्नाटक घुसलेय आतमध्ये, तुम्ही कधी कारवाई करणार नागपूरमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या पोस्टरवर त्यांनी पोस्टर चिटकवला आहे. महाराष्ट्रातील गावांवर दावा सांगण्याऱ्या कर्नाटक सरकारला कारे म्हणण्याची हिंमत महाराष्ट्र सरकारमध्ये नाही. तसेच महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना का रे… शिवरायांचा अपमान केला, हे विचारण्याची हिंमत भाजपात नाही”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

- Advertisement -

हेही वाचा – महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : आमचा बेळगाव दौरा निश्चित पण…, मंत्री शंभुराज देसाईंचे स्पष्टीकरण

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -