‘गरीब की जोरू सबकी भाभी’; मुंबईतील खड्ड्यांबाबत बोलताना भाजप आमदाराचे आक्षेपार्ह विधान

Maharashtra Monsoon Assembly Session 2022 bjp yogesh sagar controversial statement on mumbai potholes

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधानसभेत मुंबईतील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत चर्चा सुरु होती. यावेळी मुंबईतील रस्त्यांच्या खड्ड्यांबाबत बोलताना भाजप आमदार योगेश सागर यांनी आक्षेपार्ह विधान केले आहे. मुंबईची अवस्था गरीब की जोरू, सबकी भाभी अशाप्रकारचे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे. या विधान आता राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत आज विधानसभेत सविस्तर चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीमुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण असल्य़ाचे म्हणत पुढील 2 वर्षात मुंबईतील रस्त्यांवर खड्डे शोधून सापडणार नाहीत, असे आश्वासन दिले. तसेच यासंदर्भात पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

याच मुद्द्यावर बोलताना भाजप आमदार योगेश सागर यांनी वादग्रस्त विधान केले आहे. मुंबईची अवस्था गरीब की जोरू…सबकी भाभी.. असल्याचे म्हणत त्यांनी या मुंबईच्या रस्त्यावर किती एजन्सी काम करत आहेत? असा सवाल उपस्थित केला.

मुंबईतील 100 टक्के रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण होणार

मुंबईतील अनेक भागातील रस्त्यांची दुरावस्था पाहायला मिळत आहे. पावसामुळे अरुंद रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मुंबईकरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. याच पार्श्वभूमीवर आत विधानसभेत चर्चा झाली.

येत्या मार्चमध्ये उरलेल्या 423 रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या निविदेचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व रस्ते कॉंक्रिटचे केले जाणार आहे. येत्या दीड ते दोन हे काम वेळेत पूर्ण केले जाणार आहे.


राधानगरीचा 6 वा स्वयंचलित दरवाजा उघडला, धरणातून एकूण 3 हजार 28 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग