घरताज्या घडामोडीmaharashtra monsoon session 2021 : भास्कर जाधव - संजय कुटे यांच्यात अध्यक्षांच्या...

maharashtra monsoon session 2021 : भास्कर जाधव – संजय कुटे यांच्यात अध्यक्षांच्या चेंबरमध्येच राडा

Subscribe

विधानसभेचे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव आणि आमदार संजय कुटे यांच्यात धक्काबुक्की झाल्याची माहित आहे. धक्काबुक्की करणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी सुनिल प्रभू यांच्याकडून करण्यात आली आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या ठरावाच्या निमित्ताने खटके उडाल्याने आमदार संजय कुटे आणि आमदार गिरीश महाजन हे तालिका अध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत जाऊन घोषणाबाजी करत असल्याचे विधानसभेत दिसून आले होते. पण हा ठराव संमत झाल्यानंतर विधानसभेचे कामकाज हे १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. कामकाज तहकूब झाल्यानंतर अध्यक्षांच्या चेंबरमध्ये संजय कुटे आणि भास्कर जाधव यांच्यात धक्काबुक्की झाल्याचे कळते. या धक्काबुक्कीच्या घटनेनंतरच आमदार सुनिल प्रभू यांनीही भाजप आमदारांवर कारवाईची मागणी केली. जोवर कारवाई होत नाही, तोवर सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही असे सुनिल प्रभू यांनी हरकतीचा मुद्दा घेत स्पष्ट केले. (maharashtra monsoon session 2021 sanjay kute and bhaskar jadhav stood against each other over obc reservation)

ओबीसी आरक्षणासासाठी केंद्र सरकारने इम्पेरिकल डाटा उपलब्ध करुन देण्याबाबत विरोधकांच्या गदारोळातही ठराव मंजूर करण्यात आला. हा ठराव मंजुरीसाठी आलेला असताना संजय कुटे यांनी भास्कर जाधव यांचा माईक खेचून घेण्यापासून ते अध्यक्षांच्या खुर्चीजवळ जाऊन विरोध करण्याचे चित्रही दिसून आले. पण हा ठराव संमत झाल्यानंतर भास्कर जाधव यांनी सभागृहाचे कामकाज हे दहा मिनिटांसाठी तहकूब केले. कामकाज तहकूब झाल्यानंतरच तालिका अध्यक्ष असलेले भास्कर जाधव हे अध्यक्षांच्या चेंबरमध्ये गेले. त्याठिकाणीच संजय कुटे आणि भास्कर जाधव यांच्यात धक्काबुक्की झाली. या धक्काबुक्कीच्या मुद्द्यावर सुनिल प्रभू यांनी सभागृहाचे आणि अध्यक्षांचे लक्ष्य वेधले. सभागृहात आमदारांची सुरक्षा हा आमदारांचा अधिकार आहे. अशावेळी आमदारांकडूनच अध्यक्षांच्या कामकाजात बाधा आणण्याचा आणि घोषणाबाजी करण्याचा प्रकार यावर कारवाई होणे गरजेचे आहे. त्यामुळेच जोवर भाजप आमदारावर कारवाई होत नाही, तोवर विधानसभेचे कामकाज चालू देणार नाही असे सुनिल प्रभू यांनी सभागृहात स्पष्ट केले.

- Advertisement -

हा ठराव केवळ राजकीय ठराव – देवेंद्र फडणवीस

ओबीसींच्या इम्पिरीकल डेटा वरून गेले काही दिवस वादविवाद सुरू होते.दरम्यान, आज विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ओबीसींचा इम्पिरीकल डेटा केंद्र सरकारने राज्याला द्यावा असा ठराव विधानसभेत मांडण्यात आला. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी हा ठराव मांडला. विरोधकांच्या गदारोळात हा ठराव मंजूर करण्यात आला. त्यावर प्रतिक्रिया देताना हा ठराव केवळ राजकीय ठराव असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी छगन भुजबळ यांनी विधानसभेत इम्पिरीकल डेटा केंद्राने देण्याचा ठराव मांडला. बराच प्रयत्न करूनही ओबीसींचा डेटा मिळाला नाही. त्यामुळे हा ठराव मांडत असल्याचं भुजबळ यांनी सभागृहात सांगितलं. भुजबळ यांनी मांडलेल्या प्रस्तावाची देवेंद्र फडणवीस यांनी चिरफाड करताना या डेटाला आमचा पाठिंबा असल्याचंही स्पष्ट केलं. दरम्यान, तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी हा ठराव मंजुरीसाठी टाकला. यावेळी विरोधकांनी हौदात येऊन प्रचंड गदारोळ केला. या गदारोळातच तालिका अध्यक्षांनी ठराव मंजूर केला. त्यानंतर दहा मिनिटांसाठी विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -