Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र वरळी सगळ्यांना आवडू लागलीय, त्यांना मी एकदा वरळीत फिरवेन; आदित्य ठाकरेंचा...

वरळी सगळ्यांना आवडू लागलीय, त्यांना मी एकदा वरळीत फिरवेन; आदित्य ठाकरेंचा शेलारांना टोला

Subscribe

उगीच कार्यकर्त्यांची लढाई लावणे, मारामारी करणे, पोलीस केस घेणे किंवा लोकांमध्ये ताण तणाव निर्माण करणे पोलिसांवरील ताण वाढवणे यात कुठेही आम्ही जाणार नाही. अस आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केले आहे

शिंदे फडणवीस सरकार स्थापन होताच आता भाजपकडून मुंबई महापालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यात आशिष शेलार यांनी भाजप मुंबई अध्यक्ष पदाची सुत्रे हाती घेताच मुंबईतील विविध मुद्द्यावरून शिवसेना नेते आदित्य ठाकरेंना डिवचण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यात आगामी दहीहंडी उत्सवावरूनही आशिष शेलारांनी आदित्य ठाकरेंच्या मैदानात उडी घेतली आहे. आशिष शेलार यांनी वरळीतील जांबोरी मैदानात भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. यावरून आता नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. यावरूनही आदित्य ठाकरेंनी चांगली गोष्ट आहे. वरळी सगळ्यांना आवडायला लागली आहे. वरळी ए प्लस होत आहे अशा शब्दात आशिष शेलारांना टोला लगावला आहे.

यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, चांगली गोष्ट आहे. वरळी सगळ्यांना आवडायला लागली आहे. वरळी ए प्लस होत आहे. आणि प्रत्येकाने तिथे येऊन दहीहंडी साजरी करावी. आम्ही कुठेही चॅलेंज करणार नाही. हा सण आहे… दोन वर्षांपासून कोरोनाचा काळ होता, स्वाईन फ्लूपण वाढत होता… हे सगळ झाल्यानंतर आपल्याला सण-वार कुठेतरी साजरे करायला मिळत आहे. यात उगीच कार्यकर्त्यांची लढाई लावणे, मारामारी करणे, पोलीस केस घेणे किंवा लोकांमध्ये ताण तणाव निर्माण करणे पोलिसांवरील ताण वाढवणे यात कुठेही आम्ही जाणार नाही. वरळीत करु दे वांद्र्यात करू दे , कुठेही करु दे… जो कोणी सण साजरं करतोय… आम्ही या पोरकटपणात जाणार नाही, ना कोणताही बालिशपणा करणार की आम्हाला इथेच करायचा आहे तिथेच करायचा आहे. सगळ्यांनी सण साजरा करावा पण यात कुठेही राजकारण करु नये.

- Advertisement -

मला वाटतं वरळीवर त्यांच जेवढं प्रेम दिसतय. मी त्यांना एकदा घेऊन वरळीत फिरवेन की वरळीत काय काय चांगली गोष्ट झाली आहे. असा मिश्किल टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला आहे.

शिंदे – फडणवीस सरकार लोकशाही विरोधी सरकार आहे, बेईमानांचे सरकार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. राज्यात जे काही चाललं आहे फक्त आणि फक्त राजकारण चालू आहे जनतेचा आवाज कुठे ऐकू जात नाही. अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी सत्ताधारी शिंदे – फडणवीस सरकारवर हल्लाबोल केले आहे. विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असताना आदित्य ठाकरे आज अलिबाग आणि महाडमध्ये ‘शिव संवाद’ दौऱ्यासाठी जाणार आहे. दरम्यान दौऱ्यापूर्वी त्यांनी विधानसभेच्याबाहेर पत्रकारांशी संवाद साधला.

- Advertisement -

यावेळी शिवसेना आमदारांना बजावलेल्या व्हीपवर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, घटनेच्या विरोधात ते काम करतात त्याविरोधात आम्ही काही करू शकत नाही, न्यायदेवतेकडे आम्ही न्याय मागितला आहे. आम्ही घटनेचे सेवक आहोत, घटनेचे पुजारी आहोत आणि घटना माणूनंच चालू, जर आपण कायद्यात बघितले आणि घटनेत बघितले तर व्हीप हा शिवसेनेचा म्हणजे आमचाच आहे. जे 40 गद्दार आहेत ना त्यांचा व्हीप आहे ना त्यांना तिथे बसण्याचा नैतिक अधिकार नाही. पक्षाची कारवाई चालू राहते. तसेच भाजप नेते मोहित कंबोज यांच्या ट्विटवर निशाणा साधत आदित्य ठाकरे म्हणाले की, ट्विटची ही नवी पद्धत देशात आहे का, मला माहित नाही.


ईडी सरकारची उलटी गिनती सुरु, कंबोज यांच्या आरोपांवर पटोलेंचे प्रत्युत्तर

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -