घरताज्या घडामोडीएसटी कर्मचारी-अधिकाऱ्यांना सरसकट 5000 रुपये दिवाळी बोनस जाहीर

एसटी कर्मचारी-अधिकाऱ्यांना सरसकट 5000 रुपये दिवाळी बोनस जाहीर

Subscribe

एसटी महामंडळाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या दिवाळी भेटीसाठी राज्य सरकारने 45 कोटींची मदत जाहीर केली आहे. महामंडळाकडून यंदा सरसकट अधिकारी व कर्मचारी वर्गाला 5 हजार रुपये दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे.

यंदा रेल्वे महापालिका बेस्ट कर्मचाऱ्यांसह एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचीही दिवाळी गोड होणार आहे. एसटी महामंडळाच्यावतीने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना 5000 रुपये दिवाळी भेट देण्यात येणार असल्याचे महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले. (Maharashtra msrtc workers and officer will get 5000 rupees as Diwali gift)

एसटी महामंडळाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या दिवाळी भेटीसाठी राज्य सरकारने 45 कोटींची मदत जाहीर केली आहे. महामंडळाकडून यंदा सरसकट अधिकारी व कर्मचारी वर्गाला 5 हजार रुपये दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा केली असल्याची माहिती व्यस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

- Advertisement -

मागील वर्षी दिवाळीच्या दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ, विलिनीकरण आदींसह इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले होते. हे आंदोलन बरेच दिवस चिघळले होते. त्याच्या परिणामही एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर झाला होता. एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे 87 हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. दरवर्षी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आर्थिक स्वरूपात दिवाळीची भेट दिली जाते.

मागील 2 वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रवासी संख्या घटली होती. त्यामुळे एसटीला आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. शिवाय, गतवर्षी दिवाळीच्या दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ, विलिनीकरण आदींसह इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले होते. हे आंदोलन बरेच दिवस चिघळले होते. त्याच्या परिणामही एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर झाला होता. अशा परिस्थितीतही महामंडळाकडून यंदा सरसकट अधिकारी व कर्मचारी वर्गाला 5 हजार रुपये दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

दरम्यान, याआधी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी 2500 रुपये आणि 5000 रुपयांची दिवाळी भेट देण्यात येत होती. यंदाच्या वर्षी मात्र कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने यंदा राज्यभरात दिवाळीनिमित्त 1494 जादा बस गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही जादा वाहतूक 21 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2022 दरम्यान चालवण्यात येणार आहे.


हेही वाचा – 400 किलो भेसळयुक्त तूप जप्त, दिवाळीच्या तोंडावर एफडीएची मोठी कारवाई

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -