Nurses Strike : राज्यातील परिचारिकांचे आज काम बंद आंदोलन; आरोग्य सेवा कोलमडणार?

शासनाने चर्चेसाठी वेळ दिला नाही तर 28 मे पासून संपूर्ण राज्यात बेमुदत आंदोलन सुरु करु असा इशारा परिचारिका संघटनांनी दिला आहे.

strike of nurses has been postponed
परिचारिकांचे काम बंद आंदोलन स्थगित, १५ जुलैपर्यंत ठोस उपाययोजनांचे आश्वासन

खासगीकरण आणि इतर मागण्यांसाठी राज्यातील परिचारिका संघटनांनी 23 ते 25 मे पर्यंत राज्यव्यापी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. यावेळी कंत्राटी पद्धतीने होणाऱ्या पद भरतीसही महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनांनाही तीव्र विरोध केला आहे. दरम्यान 23 ते 25 मेपर्यंत राज्यातील सर्व प्रशासकीय जिल्ह्यांतील रुग्णालयात परिचारिकांनी 1 तास काम बंद आंदोलन करत निदर्शने केली. मात्र याची दखल प्रशासनाने घेतली नाही. (Nurses Agitation)

याच पार्श्वभूमीवर आता 26 ते 27 मे रोजी परिचारिकांनी काम बंद आंदोललनाचे हत्यार उपसले आहे. राज्यातील तब्बल 20 हजार परिचारिका (20 thousand nurses strike) या संपात सहभागी होणार आहेत, यामुळे राज्यातील शासकीय रुग्णालयात रुग्णसेवेवर याचा मोठा परिणाम जाणवणार आहे. दरम्यान या आंदोलनानंतरही तोडगा न निघाल्यास 28 मेपासून राज्यात बेमुदत आंदोलन करणार असल्याचा इशारा परिचारिका आणि त्यांच्या संघटनांनी दिला आहे.

राज्यभरातील आपल्या परिचारिका विविध मागण्यासाठी सोमवारपासून आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. तसेच सरकारने तोंडी आश्वासन न देता आश्वासनांची लेखी हमी देत अंमलबजावणी केली पाहिजे अशी मागणी करत तसेच न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे. परिचारिकांनी वारंवार शासनाकडे आपल्या मागण्यांसाठी पाठ पुरावा केला, मात्र तरीही शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने परिचारिकांनी आंदोलन सुरु केलेय.

त्यामुळे शासनाने चर्चेसाठी वेळ दिला नाही तर 28 मे पासून संपूर्ण राज्यात बेमुदत आंदोलन सुरु करु असा इशारा परिचारिका संघटनांनी दिला आहे. (demands of nurses)

आजच्या आंदोलनातही महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या राज्यातील सर्वच रुग्णालयातील परिचारिका सहभागी होणार आहेत. यामुळे राज्यातील रुग्णसेवेवर याचे गंभीर परिणा होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास या घटनेस सर्वतोपरी सरकार जबाबदार राहिल असा इशाराही परिचारिका संघटनेने दिली आहे. (Maharashtra State Nurses Association)


Mumbai Road Accident : मुंबईतील जवळपास निम्मे रस्ते अपघात दुचाकी वाहनांमुळेच, रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा