Maharashtra Corona Update : राज्यात आज कोरोनाचे 124 नवे रुग्ण, 113 कोरोनामुक्त

Coronavirus Cases Today 1150 new corona cases in india and 4 death
Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1150 नवे रुग्ण, 4 जणांचा मृत्यू

जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका निर्माण झाला असतानाच आता राज्यातही रुग्णसंख्या वाढतेय. राज्यात गेल्या 24 तासात 124 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कालच्या तुलनेत आज रुग्णसंख्येत किंचित वाढ झाली आहे. राज्यात आज 724 अॅटिव्ह रुग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहेय. यामुळे राज्यातील मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे.

113 रुग्ण कोरोनामुक्त रुग्णांमुळे राज्यातील एकूण कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 77,26,903 झाली आहे. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आजपर्यंत 7,97,60,948 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्वाधिक अॅटिव्ह रुग्ण हे मुंबई आणि पुण्यात आहे. त्या खालोखाल ठाण्याचा नंबर लागतो. मुंबईत सध्या 331 अॅटिव्ह रुग्ण आहेत त्यानंतर पुण्यात 231 आणि ठाण्यात 43 रुग्ण आहेत.

मुंबईत 73 नवे रुग्ण, 51 कोरोनामुक्त 

मुंबईचा विचार केला असता, मुंबईत गेल्या 24 तासात कोरोनाचे 73 रुग्ण आढळून आले आहेत, तर 51 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 1038676 झाली आहे. तर बरे झालेल्या रुग्णांचा दर 98 टक्के झालेय. मुंबईत सध्या 331 सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान मुंबई रुग्ण दुप्पट होण्याचा दर 16538 दिवसांवर गेला आहे. तर 6 एप्रिल ते 12 एप्रिलदरम्यान कोविड वाढीचा दर 0.004 टक्क्यांवर पोहचला आहे. मुंबई आज कोरोनाच्या 9970 चाचण्या करण्यात आल्या. आज नोंद झालेल्या 73 कोरोना रुग्णांपैकी 5 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


राज्यातील महत्वाकांक्षी योजना तसेच प्रकल्पांच्या कामाला वेग द्या; मुख्यमंत्र्यांचे आदेश