घरताज्या घडामोडीराज्यातील 'या' जिल्ह्यात पुढील तीन दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पुढील तीन दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता

Subscribe

जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. जोरदार वारा आणि मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.

जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. जोरदार वारा आणि मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यानंतर पुढील पंधरवड्यात पावसाने मुंबईसह राज्यभरात दडी मारली. त्यानंतर पुन्हा एकदा राज्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानुसार, हवामान विभागाकडून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच, मुंबई, पुण्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिला आहे.

विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

- Advertisement -

कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. परंतु, मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात पुढील चार दिवस अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तसेच, येलो आणि ऑरेंज अलर्टचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

राधानगरी धरणात 169.72 दलघमी पाणीसाठा

- Advertisement -

कोल्हापुर जिल्ह्यातील राधानगरी धरणात 169.72 दलघमी पाणीसाठा असून, धरणातून 600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान, महाराष्ट्रासह केरळच्या अनेक भागात ४ ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

मुसळधार ते अति मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, हवामान खात्याने आजही उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरसह अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली होती.

मुंबईतही 7 आणि 8 ऑगस्टला मुसळधार पाऊस

मुंबईतही येत्या 7 आणि 8 ऑगस्टला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात पुन्हा मान्सून पावसाचे पुनरागमन झाल्याचे सांगण्यात आले आहे. बंगालच्या उपसागरात येत्या 48 तासात पुन्हा कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असल्याने विदर्भ मराठवाड्यातही जोरदार पावसाची शक्यता आहे.


हेही वाचा – मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा कायम; भाजपमुळे विस्ताराचा घोळ

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -