घरताज्या घडामोडीMaharashtra Petrol-Diesel Price : मुंबई ते नाशिकपर्यंत राज्यातील प्रमुख शहरात पेट्रोल डिझेल...

Maharashtra Petrol-Diesel Price : मुंबई ते नाशिकपर्यंत राज्यातील प्रमुख शहरात पेट्रोल डिझेल महागले, जाणून घ्या आजचे दर

Subscribe

भारतात मागच्या वर्षभरापासून इंधानाच्या किंमती गगनाला भिडल्या होत्या. मात्र आता युद्ध सुरू झाल्यानंतर इंधनाच्या किंमतींचा चांगलाच विस्फोट झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Maharashtra Petrol-Diesel Price : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु झालेल्या युद्धाचे पडसाद संपर्ण जगभरात उमटत आहेत. रशियाने युक्रेनवर हल्ला करताच आंतराराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलांच्या किंमती झपाट्याने वाढल्याचे पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती १०३ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत. याचा मोठा परिणाम पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर झाला. भारतात मागच्या वर्षभरापासून इंधानाच्या किंमती गगनाला भिडल्या होत्या. मात्र आता युद्ध सुरू झाल्यानंतर इंधनाच्या किंमतींचा चांगलाच विस्फोट झाल्याचे पाहायला मिळत आहे.

सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या नव्या किंमती जारी केल्या आहेत. देशात इंधनाच्या किंमती वाढल्या असल्या तरी राज्याला आज दिलासा मिळाला आहे. कारण राज्यातील पेट्रोल डिझेलच्या किंमती आज कोणताही बदल झालेला नाही. मात्र महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील पेट्रोलच्या किंमती या १०० रुपयांच्या पार गेल्या आहेत. मुंबई, पुणे ते नाशिक पर्यंत जिल्ह्यांतील पेट्रोल डिझेलचे आजचे दर जाणून घ्या.

- Advertisement -

मुंबई
पेट्रोल – १०९.९८ रुपये प्रति लीटर
डिझेल – ९४.१४ रुपये प्रति लीटर

ठाणे
पेट्रोल – १०९.५१ रुपये प्रति लीटर
डिझेल – ९२.२८ रुपये प्रति लीटर

- Advertisement -

पुणे
पेट्रोल – १०९.७२ रुपये प्रति लीटर
डिझेल – ९२.५० रुपये प्रति लीटर

नाशिक
पेट्रोल – ११०.४० रुपये प्रति लीटर
डिझेल – ९३.१६ रुपये प्रति लीटर

नागपूर
पेट्रोल – ११०.०२ रुपये प्रति लीटर
डिझेल – ९२.८३ रुपये प्रति लीटर

कोल्हापूर
पेट्रोल – ११०.५३ रुपये प्रति लीटर
डिझेल – ९३.३१ रुपये प्रति लीटर

अहमदनगर
पेट्रोल – ११०.२६ रुपये प्रति लीटर
डिझेल – ९३.०३ रुपये प्रति लीटर

अमरावती
पेट्रोल – ११०.१९ रुपये प्रति लीटर
डिझेल – ९२.९९ रुपये प्रति लीटर


हेही वाचा – युक्रेनमधील विध्वसांचे दृश्य; रस्त्यावर, ATM बाहेर नागरिकांच्या लांब रांगा

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -