घरताज्या घडामोडी'त्या' शपथविधीनंतर पवारांनी अजितदादांना 'असं' केलं माफ; 'लोक माझे सांगाती'मध्ये खुलासा

‘त्या’ शपथविधीनंतर पवारांनी अजितदादांना ‘असं’ केलं माफ; ‘लोक माझे सांगाती’मध्ये खुलासा

Subscribe

2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर आणि नंतर महाराष्ट्रात अनेक राजकीय उलथापालथ झाली. शिवसेना-भाजपाची युती तुटली. अजित पवारांनी बंड करून भाजपाशी युती करत सकाळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत राज्यात महाविकास आघाडीची स्थापना केली. मात्र महाविकास आघाडीची स्थापना झाली तरी, राज्याच्या राजकारणात तेव्हा अजित पवारांच्या शपथविधीची चर्चा रंगली होती.

2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर आणि नंतर महाराष्ट्रात अनेक राजकीय उलथापालथ झाली. शिवसेना-भाजपाची युती तुटली. अजित पवारांनी बंड करून भाजपाशी युती करत सकाळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत राज्यात महाविकास आघाडीची स्थापना केली. मात्र महाविकास आघाडीची स्थापना झाली तरी, राज्याच्या राजकारणात तेव्हा अजित पवारांच्या शपथविधीची चर्चा रंगली होती. परंतु, अजित पवारांनी इतकं मोठं पाऊल उचलल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांना माफ कसे केले, याची चर्चा सर्वत्र सुरू होती. मात्र नुकताच प्रकाशन झालेल्या शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात याबाबत खुलासा करण्यात आला आहे. (Maharashtra MVA Sharad Pawar Lok Maze Sangati Book Ajit Pawar Uddhav Thackeray Devendra Fadnavis BJP NCP)

शरद पवार यांच्या राजकीय आत्मचरित्र असलेल्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचे आज प्रकाशन होत आहे. या आवृत्तीमध्ये त्यांनी राज्यातील सत्तांतराच्या सगळ्या प्रवासाबद्दल लिहिलं आहे. त्याचबरोबर अजित पवार यांनी राष्ट्रवादीशी बंड करून पहाटेचा शपथविधी केल्याबद्दलही मोठा खुलासा केला आहे. ‘अजित पवार यांनी केलेल्या बंडाला राष्ट्रवादीचा कसलाही पाठिंबा नव्हता, त्यांनी त्यांच्यासोबत काही आमदार घेऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली पण तो प्रयोग यशस्वी ठरला नाही. कारण त्याला राष्ट्रवादी पक्षाचा पाठिंबा नव्हता. त्यानंतर महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि नवं सरकार स्थापन झालं’ असा उल्लेख या आत्मचरित्रामध्ये करण्यात आला आहे.

- Advertisement -

अजित पवारांनी एवढं मोठं पाऊल उचलणं आणि बंड अयशस्वी ठरणं यावर अजित पवार जास्त बोलत नव्हते. मात्र असं असलं तरी, त्यावर पडदा पडणे त्यावेळी फार महत्त्वाचं होते. परिणामी विषय कौटुंबिक असल्याने शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्याजवळ अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त केल्याचे या आत्मचरित्रामध्ये स्पष्ट केले आहे. “जे घडलं ते चुकीचं झालं, असं घडायला नको होतं”, अशा शब्दांत अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त केली आणि या वादावर पडदा पडल्याचा उल्लेख या पुस्तकात केला आहे.

दरम्यान, या आत्मचरित्रामध्ये अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधी सोहळ्याची चाहूल शरद पवारांना त्या दिवशी पहाटे ६.३० वाजताच कळाली होती. हा त्यांच्यासाठी खूप मोठा धक्का होता पण ही गोष्ट समजताच त्यांनी उद्धव ठाकरे यांना कॉल केला आणि या बंडाला राष्ट्रवादीचा पाठिंबा नसल्याचे सांगितले. पण या शपथविधीमुळे महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यासही मदत झाल्याचेही पवारांनी या आत्मचरित्रामध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Airport Maintenance: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दुरुस्ती आणि देखभालीसाठी आज 6 तास बंद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -