घरताज्या घडामोडीशिंदे-फडणवीसांच्या सरकारमध्ये शेतकरी दुय्यम झालाय, बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल

शिंदे-फडणवीसांच्या सरकारमध्ये शेतकरी दुय्यम झालाय, बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल

Subscribe

मागील अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनातही विरोधक शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत आहेत.

मागील अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनातही विरोधक शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत आहेत. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. ‘आजच्या सरकारमध्ये शेतकरी दुय्यम झाला आहे. ते आज स्मार्ट सिटी आणि मेट्रोत व्यस्त झाले. मात्र ही शहर मोठी झाली ती शेतकऱ्याच्या कष्टामुळे हे विसरुन चालणार नाही. आमचे सरकार ज्यावेळी सत्तेत होते, त्यावेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि खर्चाचा विचार न करता मदत करण्याचे काम केले’, अशा शब्दात बाळासाहेब थोरात यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

कांदा आणि वीजप्रश्नी संगमनेर बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी जयश्री थोरात यांच्यासह डॉ. सुधीर तांबे देखील आंदोलनात सहभागी झाले होते. राज्यातील कांदा आणि वीजप्रश्नी केलेल्या ठिय्या आंदोलनात बाळासाहेब थोरात यांनी आक्रमक भाषण केले. या भाषणात थोरात यांनी सरकरच्या धोरणाचा निषेध केला.

- Advertisement -

‘यापूर्वी आमचं सरकार ज्या ज्या वेळी सत्तेत होतं त्यावेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहताना खर्चाचा विचार न करता मदत करण्याचे काम केले. आजच्या सरकारमध्ये मात्र शेतकरी दुय्यम झाला आहे. ते आज स्मार्ट सिटी आणि मेट्रोत व्यस्त झाले. मात्र ही शहर मोठी झाली ती शेतकऱ्याच्या कष्टामुळे हे विसरुन चालणार नाही. व्यापारी कवडीमोल भावाने कांदा खरेदी करतो आणि नाफेडला विकतो अशी परिस्थिती आहे’, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

राज्याचे प्रश्न सोडवण्याऐवजी काही नेते जिरवाजिरवीचं राजकरण करत आहेत. मात्र एक दिवस तुमची जिरेल हे लक्षात ठेवा, असा टोलाही बाळासाहेब थोरात यांनी महसूलमंत्री विखे यांचे नाव न घेता लगावला आहे. तसेच, ‘अधिकाऱ्यांनी सुद्धा लक्षात ठेवा सरकार आज असतं, उद्या नसतं, तुम्ही नियमाप्रमाणे काम करा. कोणाचे फोन आले म्हणून जिरवाजिरवीचे उद्योग तुम्ही करु नका’, अशा शब्दांत बाळासाहेब थोरात यांनी अधिकाऱ्यांना दम दिला.

- Advertisement -

‘मध्यप्रदेशमधील वीज बिल माफीबाबत खूप मोठी भाषण केली. आज अनेक जुनी भाषण व्हायरल होत आहेत. त्यांनी केलं तर आता तुम्हाला का करता येत येत नाही. आज कांदाच नव्हे तर भाजीपाल सुद्धा फुकट देण्याची वेळ आली आहे. 2014 ला गॅस सिलेंडर 350 आज 1100 च्या वर गेली. त्यावेळी 5 रुपये वाढल्यावर टाकीवर बसून घोषणा देणारी बाई कुठे गायब झाली? लबाडी कशी करायची याचं उदाहरण आज दिसत’, असेही थोरात म्हणाले.


हेही वाचा – मनीष सिसोदियांच्या कोठडीत वाढ, जामीनावरील निर्णय १० मार्चपर्यंत राखीव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -