घरअर्थजगतनाशिकच्या नोटप्रेसमध्ये 500च्या जवळपास 2 हजार 800 मिलियन नोटांची होणार छपाई

नाशिकच्या नोटप्रेसमध्ये 500च्या जवळपास 2 हजार 800 मिलियन नोटांची होणार छपाई

Subscribe

भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank Of India) बाजारातून 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला असून 30 सप्टेंबर 2023 पर्यंतच नोटा वापरता येणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे. अशातच 2000च्या (Two Thousand) नोटा चलनातून बाद होणार असल्याने भविष्यात 500 रुपयांच्या नोटांची मागणी वाढणार आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank Of India) बाजारातून 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला असून 30 सप्टेंबर 2023 पर्यंतच नोटा वापरता येणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे. अशातच 2000च्या (Two Thousand) नोटा चलनातून बाद होणार असल्याने भविष्यात 500 रुपयांच्या नोटांची मागणी वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकच्या नोटप्रेसमध्ये पाचशेच्या जवळपास 2 हजार 800 मिलियन नोटांची छपाई करण्यात येणार आहे. (maharashtra nashik printing of 2 thousand million notes of five hundred rupees note press)

पाचशेच्या जवळपास 2 हजार 800 मिलियन नोटांची छपाई करण्यात येणार असल्याने नाशिकच्या (Nashik) नोट प्रेसमधील 1500 कामगारांना येत्या 2 दिवसात पुढील 4 महिन्याच्या कालावधीत नोटबंदीच्या काळाप्रमाणेच 24 तास कामकाज करावे लागणार आहे.

- Advertisement -

2018-19 मध्येच 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद

2018-19 मध्येच 2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती. नागरिकांना 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी 4 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे मंगळवारपासून 2 हजारांच्या नोटा नागरिकांना बँकेत जाऊन बदलता येणार आहेत.

- Advertisement -

दरम्यान, काही महिन्यापूर्वी अर्थ मंत्रालयाने नाशिक करन्सी नोट प्रेसला 500 रुपयांच्या नोटांची छपाई करण्याचे उद्दिष्ट दिले होते. एप्रिलपासून आतापर्यंत 30 कोटी नोटांची छपाईही झाली आहे.

एक 2 हजाराच्या नोटसाठी 500रुपयांच्या 4 नोटांची गरज

येत्या काही दिवसांतच 2 हजार रुपयांची नोटच चलनातून बाद होत असल्याने एक दोन हजाराची नोट बदलून देण्यासाठी पाचशे रुपयांच्या 4 नोटा लागणार असल्याने 500च्या नोटांची मागणी वाढणार आहे. अपुऱ्या मनुष्यबळातही हे उद्दिष्ट कामगार पूर्ण करतील असा मजदूर संघाच्या नेतृत्वाला विश्वास आहे.

2 हजारांच्या अंदाजे 1 हजार 833 मिलियन नोटा बाजारात

सध्या 2 हजारांच्या अंदाजे 1 हजार 833 मिलियन नोटा बाजारात आहेत. म्हैसूर, सालभोनी, देवास आणि नाशिकमध्ये या नोटा तयार केल्या जाणार असून येत्या 4 महिन्यात 2 हजार 800 मिलियन नोटाची छपाई एकट्या नाशिक नोटप्रेसमध्ये होणार आहे.


हेही वाचा – ‘नार्कोटेस्टसाठी तयार पण…’, ब्रिजभूषण यांच्या आव्हानाला विनेश फोगटचे प्रत्युत्तर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -