घरमहाराष्ट्रमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १७ वा वर्धापन दिन, राज ठाकरेंच्या सभेकडे राज्याचं...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १७ वा वर्धापन दिन, राज ठाकरेंच्या सभेकडे राज्याचं लक्ष

Subscribe

Maharashtra Navnirman Sena Anniversary | वर्धापन दिनाच्या आधीच अधिकृत ट्वीटर खात्यावरून नव्या दमाने, नव्या आयुधांसह, नवनिर्माणास सज्ज असं कॅप्शन देत आजच्या कार्यक्रमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

Maharashtra Navnirman Sena Anniversary | मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १७ वा वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे आज ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये सभा घेणार आहेत. या सभेत ते काय नवी घोषणा करतात हे पाहावं लागणार आहे.

राज्यातील राजकीय स्थिंत्यतरे आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तयारीला लागली आहे. त्यापार्श्वभूमीवर आजच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाण्यात राज ठाकरेंसाठी मोठ्याप्रमाणात पोस्टरबाजी करण्यात आली असून मनसेचे कार्यकर्ते शक्तीप्रदर्शन करणार आहेत.

- Advertisement -

वर्धापन दिनाच्या आधीच अधिकृत ट्वीटर खात्यावरून नव्या दमाने, नव्या आयुधांसह, नवनिर्माणास सज्ज असं कॅप्शन देत आजच्या कार्यक्रमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.


२७ नोव्हेंबर २००५ रोजी राज ठाकरेंनी शिवसेनेला रामराम ठोकला. त्यानंतर त्यांनी ९ मार्च २००६ रोजी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची स्थापना केली. यावेळी शिवसेनेतील असंख्य कार्यकर्ते राज ठाकरेंसोबत मनसेत जोडली गेली.

- Advertisement -

मनसेचा सुरुवातीचा झंझावात इतका प्रखर होता की पहिल्याच निवडणुकीत १३ आमदार निवडून आले होते. मराठी अस्मितेचा मुद्दा, महाराष्ट्रा विकासाचे मुद्दे घेऊन मनेसेने त्यावेळी निवडणूक लढवली. परंतु, कालांतराने सर्व आमदारांनी टप्प्याटप्प्याने पक्षांतर केले. आज मनसेचा एकमेव आमदार विधिमंडळात आहे. त्यामुळे कधीकाळी एका दणक्यात १३ आमदार निवडून आणणाऱ्या मनसेचा आता १७ वर्षांत फक्त एकच आमदार निवडून येतोय यामुळे पक्षाची ताकद कमकुवत झाली असल्याचं बोललं जातंय.

पक्षसंघटनेचा अभाव, पक्षबांधणीचा अभाव, कार्यकर्त्यांशी संपर्क नसणे, सतत भूमिका बदलणे आदी विविध कारणांमुळे मनसेने महाराष्ट्रात म्हणावी तशी उभारी घेतली नसल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे आता १७ व्या वर्षानंतर राज ठाकरे पुन्हा एकदा पक्षबांधणीसाठी जोमाने उभे राहतील का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महाराष्ट्रातील राजकीय स्थित्यंतर, आगामी निवडणुका लक्षात घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला स्वतःचं अस्तित्व उभं करण्यास वाव आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी महाराष्ट्र दौऱ्यांना सुरुवात केली आहे. पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. तसंच, आज सभा असल्याने आजच्या सभेत ते काय घोषणा करतात हेही पाहावं लागणार आहे. दरम्यान, संदीप देशपांडे यांच्यावर नुकताच हल्ला झाला होता, या हल्ल्यानंतर राज ठाकरेंची अधिकृत प्रतिक्रिया समोर आली नव्हती. त्यामुळे आजच्या सभेत या हल्ल्याबाबतही राज ठाकरे बोलण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -