गर्दी करणारे, खोटं बोलणारे कार्यकर्ते नकोत; अमित ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण चांगलीच तयारीला लागली आहे. यात राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडींचा फायदा घेत मनसे आपला पक्ष पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. अशात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्ष अमित ठाकरे यांनी मला गर्दी करणारे आणि खोटे बोलणारे कार्यकर्ते नको अशा स्पष्ट इशारा दिला आहे. त्यामुळे मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सर्व तयारीनिशी आगामी काळात काम करावे लागणार आहे.

अमित ठाकरे म्हणाले की, मी दौरा काढल्यापासून अनेक नवीन विद्यार्थी आणि तरुण कार्यकर्ते मनसेमध्ये काम करण्यास इच्छुक आहेत. ते मला भेटतात, पण गर्दी करणारे आणि खोटे बोलणारे कार्यकर्ते मला नको, त्यामुळे मी अनेकांच्या भेटी घेत असून पक्ष वाढीसाठी नवीन तरुणांना संधी देत आहे. बीडमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. मागील आठवड्यात 7 ऑक्टोबर रोजी त्यांनी उस्मानाबादमधील तुळजाभवानी मातेचे दर्शन घेत दौऱ्याला सुरुवात केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बळकटी देण्यासाठी अमित ठाकरे सध्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. मराठवाडा दौऱ्यात अमित ठाकरे पहिल्यांदाच बीडमध्ये पोहोचले. यानंतर संध्याकाळी ते परळीमध्ये दाखल झाले. यावेळी परळीतील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे जंग्गी स्वागत केले. ज्यानंतर अमित ठाकरे यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंग दर्शन घेतले. यात आज कंकालेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर ते बैठकीत सहभागी घेतील, यानंतर नारायण गड आणि भगवानगडावर जाऊन देखील ते दर्शन घेणार आहेत.

दरम्यान 11 ऑक्टोबर रोजी परभणीत फर्न हॉटेल सभागृहात महाविद्यालयीन तरुणांशी संवाद साधला. मुंबईत राहून तुमचे प्रश्न कळणार नाहीत. त्यामुळे मी इथे तुमचे प्रश्न ऐकण्यासाठी आलोय. पुढच्या काळात एक मोठी युवा शक्ती आपल्याचा उभी करायची असून त्यासाठी सर्वांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेसोबत यावे असे आवाहन अमित ठाकरे यांनी केले आहे. मराठवाडा दौऱ्यापूर्वी अमित ठाकरे सोलापुरामध्ये गेले होते.

अमित ठाकरेंचा राज्यभरात दौरा

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची जबाबदारी अमित ठाकरे यांच्या खांद्यावर आहे. ही जबाबदारी घेतल्यापासून अमित ठाकरे राज्यभर दौरा करत आहेत. अमित ठाकरे यांनी यापूर्वी मुंबई, कोकण, ठाणे, पालघर आणि नाशिक दौऱ्यावर गेले होते. यावेळी युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


जागतिक पातळीवर गौरवलेले महाविकास आघाडी सरकार कपटाने पाडले, जयंत पाटलांची टीका