घरमहाराष्ट्रMaharashtra NCP Crisis : आता आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष काय निर्णय देणार?

Maharashtra NCP Crisis : आता आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष काय निर्णय देणार?

Subscribe

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शरद पवार गटाकडून नवी मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेचे नाव 'आमचा पक्ष आणि आमचा चिन्ह शरदचंद्र गोविंदराव पवार', असे आहे.

मुंबई : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाला दिले आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे काय निकाल देणार आहेत. याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या प्रकरणचा निकाल राहुल नार्वेकरांना 15 फेब्रुवारीपर्यंत द्यावा लागणार आहे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

निवडणूक आयोगाने शिवसेनेबाबत जो निकाल दिला, त्याच आधारे राष्ट्रवादी काँग्रेसचा निकाल दिला आहे. आमदार अपात्रता निकाल 14 फेब्रुवारीपर्यंत विधानसभा अध्यक्ष देण्याची शक्यता आहे. पण राष्ट्रवादीचा निकाल हा शिवसेनेच्या निकालापेक्षा वेगळा लागण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शरद पवार गटाकडून नवी मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेचे नाव ‘आमचा पक्ष आणि आमचा चिन्ह शरदचंद्र गोविंदराव पवार’, अशी आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांचीच! शरद पवारांना धक्का, पक्षासह चिन्हही गेले

- Advertisement -

शिवसेनेचा निकाल शिंदेंच्या बाजूने लागला

महिन्याभरापूर्वी राहुल नार्वेकरांनी शिवसेना पक्ष शिंदे गटाचा असल्याचा निकाल दिला आहे. यात शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटातील आमदार हे पात्र झाले. राहुल नार्वेकरांच्या निकालावर ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीव ठाकरे गटाने महापत्रकार परिषद घेत राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाची चिरफाड केली होती.

हेही वाचा – NCP : उद्यापर्यंतच पक्षाचं नाव, चिन्ह कळवा अन्यथा…; शरद पवारांना निवडणूक आयोगाचा इशारा

आयोगाच्या निकालापूर्वीच शरद पवार गटाची चिन्हाबाबत बैठक

निवडणूक आोयगाच्या निकालानंतर शरद पवार गटाला नवे चिन्ह शोधावे लागणार आहे. या दिशेने शरद पवार गटाची तयारी देखील सुरू झाली आहे. जर निवडणूक आयोगाचा निकाल शरद पवार गटाच्या विरोधात गेला, तर पक्षाचे चिन्हे काय असावे, याबाबत शरद पवार गटाची बैठक झाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -