घरCORONA UPDATECoronavirus Update: आज राज्यात ३,३९० कोरोना रुग्णांची नोंद; तर १२० जणांचा मृत्यू

Coronavirus Update: आज राज्यात ३,३९० कोरोना रुग्णांची नोंद; तर १२० जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यात आज ३ हजार ३९० नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून १२० जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ हजार ६३२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण ५० हजार ९७८ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यात एकूण ५३ हजार ०१७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या एकूण १ लाख ०७ हजार ९५८ इतकी झाली आहे.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ८१ पुरुष तर ३९ महिला आहेत. नोंद झालेल्या १२० मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ६६ रुग्ण आहेत. तर ४० रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १४ जण ४० वर्षांखालील आहे. या १२० रुग्णांपैकी ८० जणांमध्ये (६७ %) मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड – १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३ हजार ९५० झाली आहे. एकूण मृत्यूपैंकी ४३ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत. तर उर्वरित मृत्यू २ जून ते ११ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ७७ मृत्यूंपैकी मुंबई ५८, जळगाव – ८, नाशिक -३, ठाणे -३, उल्हासनगर -३, रत्नागिरी -१, पुणे १ मृत्यू असे आहेत.

- Advertisement -

राज्यात सध्या ५५ शासकीय आणि ४२ खाजगी अशा एकूण ९७ प्रयोगशाळा कोविड१९ निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६,५७,७३९ नमुन्यांपैकी १,०७,९५८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,८७,५९६ लोक होमक्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात१५३५ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७७,१८९ खाटा उपलब्ध असून सध्या २९,६४१लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील रुग्णांची सविस्तर आकडेवारी

अ.क्र जिल्हा / महानगरपालिका बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणांमुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
१ मुंबई महानगरपालिका – ५८२२६ – २६९८६ – २१८२ – ८ – २९०५०
२ ठाणे – १८०८० – ६८७१ – ४३४ – १ – १०७७४
३ पालघर – २३२६ – ७१४ – ५० – ० – १५६२
४ रायगड – १८६८ – ११६३ – ६४ – २ – ६३९
५ नाशिक – १९३४ – ११७८ – १०५ – ० – ६५१
६ अहमदनगर – २३९ – १६६ – ९ – ० – ६४
७ धुळे – ३९३ – २२३ – २६ – १ – १४३
८ जळगाव – १७०२ – ६६८ – १३१ – ० – ९०३

- Advertisement -

अ.क्र जिल्हा / महानगरपालिका बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणांमुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
९ नंदूरबार – ४८ – ३० – ४ – ० – १४
१० पुणे – १२१८४ – ६७५० – ४८० – ० – ४९५४
११ सोलापूर – १८२० – ६७६ – १३१ – ० – १०१३
१२ सातारा – ७४१ – ४३६ – २८ – ० – २७७
१३ कोल्हापूर – ६९४ – ५३२ – ८ – ० – १५४
१४ सांगली – २२५ – १२० – ७ – ० – ९८
१५ सिंधुदुर्ग – १५० – ७८ – ० – ० – ७२
१६ रत्नागिरी – ३९२ – २७६ – १६ – ० – १००
१७ औरंगाबाद – २६६८ – १४५५ – १३५ – ० – १०७८
१८ जालना – २७२ – १५९ – ६ – ० – १०७
१९ हिंगोली – २३९ – १८७ – १ – ० – ५१
२० परभणी – ८२ – ६९ – ३ – ० – १०
२१ लातूर – १७६ – १२० – ८ – ० – ४८
२२ उस्मानाबाद – १४६ – ११३ – ५ – ० – २८
२३ बीड – ७५ – ४९ – २ – ० – २४
२४ नांदेड – २३५ – १५१ – १० – ० – ७४
२५ अकोला – १०२१ – ५६८ – ४२ – १ – ४१०
२६ अमरावती – ३४४ – २४३ – २१ – ० – ८०
२७ यवतमाळ – १८१ – १३६ – ३ – ० – ४२
२८ बुलढाणा – १२५ – ७३ – ३ – ० – ४९
२९ वाशिम – ४९ – ६ – २ – ० – ४१
३० नागपूर – १०१३ – ५९८ – १२ – ० – ४०३
३१ वर्धा – १४ – ८ – १ – ० – ५
३२ भंडारा – ४९ – ४१ – ० – ० – ८
३३ गोंदिया – ७० – ६९ – ० – ० – १
३४ चंद्रपूर – ४७ – २७ – ० – ० – २०
३५ गडचिरोली – ४९ – ३९ – १ – ० – ९

इतर राज्ये /देश ८१ – ० – २० – ० – ६१
एकूण – १,०७,९५८ – ५०९७८ – ३९५० – १३ – ५३०१७

हेही वाचा –

Unlock Mumbai: उद्यापासून लोकल सेवा होणार सुरु?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -