Maharashtra News : राज्यात उशीरा दाखल झालेल्या पावसाचे प्रमाण (Maharashtra Rain) यंदाच्या वर्षी खूप कमी आहे. राज्यातील अनेक भागात पावसाने हवी तशी हजेरी लावलेली नाही. परंतु पावसाने सुरूवातीला हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली आणि पेरणी केलेली उभी पीकं करपली. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त असून येत्या काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. कारण पावसाअभावी पाणीसाठाही पाहिजे तसा झालेला नाही. या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी शासनाने राज्यात दुष्काळ जाहीर करावा (Drought should be declared in the state), अशी मागणी ट्वीट करत केली आहे. (Maharashtra News Government should declare drought in the state NCP demand)
सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करताना म्हटले की, महाराष्ट्रात जुन व जुलै महिन्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यातच ऑगस्ट महिन्यात देखील सरासरीपेक्षा सुमारे 68 टक्क्यांनी पाऊस कमी झाला आहे. या महिन्यातील दि. 1 ते 18 ऑगस्ट दरम्यान सर्वच विभागांत पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा 80 टक्क्यांनी कमी आहे. बहुतेक ठिकाणी पाऊस पडलेला नाही. ही परिस्थिती भीषण असून शेतकऱ्यांचे हातचे पीक निघून गेले आहे, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.
महाराष्ट्रात जुन, जुलै या महिन्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यातच या ऑगस्ट महिन्यात देखील सरासरीपेक्षा सुमारे ६८ टक्क्यांनी पाऊस कमी आहे. दि. १ ते १८ ऑगस्ट दरम्यान सर्वच विभागांत पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा ८० टक्क्यांनी कमी आहे. बहुतेक ठिकाणी पाऊस पडलेला नाही. हि परिस्थिती…
— Supriya Sule (@supriya_sule) August 24, 2023
राज्यात दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा
पावसाअभावी शेतकरी संकटात सापडला असून त्यांना पीक विम्याचा लाभ मिळणे आवश्यक आहे. यासोबतच महाराष्ट्र शासनाने राज्यात दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करताना सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तसेच राज्यातील परीस्थितीचा तातडीने आढावा घ्यावा, पिण्याच्या पाण्याचे टॅंकर, जनावरांसाठी चारा छावण्या आणि इतर दुष्काळी कामे हाती घेण्यासंदर्भात तातडीने सकारात्मक विचार करुन अंमलबजावणी करावी, असे आवाहनही सुप्रिया सुळे यांनी केले.
हेही वाचा – शरद पवारांच्या सभेवरून प्रफुल्ल पटेल यांचा उपरोधिक टोला, म्हणाले – “विरोधात बोलले तरी…”
शेतीला मोठा फटका बसण्याची शक्यता
राज्यात उशीरा दाखल झालेल्या पावसाने अनेक जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी नोंद केली आहे. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्हे तहानलेलेच आहेत. विदर्भातील काही जिल्हे आणि कोकणात काही प्रमाणात पावसानं हजेरी लावली आहे. मात्र, अन्य भागात पावसानं दडी मारल्याचं चित्र आहे. त्यामुळं हातची पीकं वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच सोयाबिन, भुईमूग, नागली, भात पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच भागात बळीराजा पावसाची आतुरतेने वाट बघत आहे. याशिवाय राज्यात पाणी टंचाईचं संकट देखील निर्माण होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.