घर महाराष्ट्र Maharashtra News : बुलढाण्यातील सभेत मुख्यमंत्री दुष्काळावर बोलले, पण...

Maharashtra News : बुलढाण्यातील सभेत मुख्यमंत्री दुष्काळावर बोलले, पण…

Subscribe
Maharashtra News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज (3 सप्टेंबर) ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी बुलढाण्यात आले होते. यावेळी त्यांनी दुष्काळावर भाष्य करताना सरकारची तिजोरी खुली करायला मागे-पुढे बघणार नाही, असं आश्वासन त्यांनी दिलं. मात्र दुष्काळासंदर्भात कोणतीच घोषणा त्यांनी कोणतीच घोषणा केलेली नाही. त्यामुळे दुष्काळप्रश्नी विरोधकांना त्यांच्यावर निशाणा साधण्याची एक संधीच एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. (Maharashtra News In a meeting in Buldhana Chief Minister spoke about drought but)
एकनाथ शिंदे शासना आपल्या दारी कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज आपण विकासाची गंगा आणण्यासाठी समृद्धी एक्सप्रेस महामार्ग तयार केलेला आहे. त्यामुळे या भागातल्या शेतकऱ्यांना समृद्धीचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल, यासाठी काम करण्याचं शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. पावसाने ओढ घेतलेली आहे. पाऊस लांब गेलेला आहे. त्यामुळे आपण याठिकाणी दुष्काळाचं चित्र पाहत आहोत. पण सरकार यासाठी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार उभं राहील. आपल्याला जे जे काही पाहिजे तेव्हा या सरकारची तिजोरी खुली करायला सरकार मागं-पुढं बघणार नाही. मग पाणी असेल, चारा असेल, शेतीला पाणी असेल या सगळ्या बाबतीत सरकार तुमच्या मागे उभं राहील, अशा विश्वास एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. मात्र त्यांनी कोणतीही घोषणा केल्याचे पाहायला मिळाले नाही. 

दुष्काळ नियंत्रण वॅार रुम 

राज्यात यंदाच्या वर्षी पावसाचे प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे काही भागात दुष्काळी परिस्थिती उद्भवू शकते. याचपार्श्वभूमीवर राज्य सरकारने दुष्काळ नियंत्रण वॅार रुम तयार केले असून यासाठी विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. हे अधिकारी दुष्काळी भागाचा आढावा घेतील आणि त्यानुसार निर्णय घेतले जाणार आहेत. राज्यातील पाणीसाठा आणि स्त्रोत यांच्या उपलब्धतेनुसार पाण्याचे आरक्षण केले जाणार आहे. नुकतच राज्य सरकारने धरणातील पाणीसाठ्याचे आरक्षण करण्याचे आदेश दिले होते. यानुसार उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठी, शेतीसाठी, व्यावसायिक वापराकरता आरक्षित केला जाणार आहे.

हेही वाचा – आम्ही मराठा आंदोलकांसोबत, पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवले; विरोधकांनी राजकारण करु नये – मुख्यमंत्री

बळीराजा संकटात

- Advertisement -

राज्यातील अनेक भागात पावसाने हवी तशी हजेरी लावलेली नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. तसेच येत्या काही दिवसात पावसाचं प्रमाण आणखी घटण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पावसाचा एक महिना बाकी असला तरी मराठवाडा (Marathwada) आणि उत्तर महाराष्ट्रात (Uttar Maharashtra) ऐन पावसाळ्यात दुष्काळाच्या (Drought) झळा बसू लागल्या आहेत. पेरणी केलेली पिके करपू लागली आहेत. त्यामुळे बळीराज संकटात सापडला आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -