घरमहाराष्ट्रमुंबई महापालिका शाळेतून घडणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरणपटू

मुंबई महापालिका शाळेतून घडणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरणपटू

Subscribe

देश - विदेशात जलतरण क्रीडा स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक अथवा अन्य पदक जिंकणारे जलतरणपटू फार कमी आहेत. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या शिक्षण खात्याकडून महापालिका शाळांमधील २०५ विद्यार्थ्यांना तीन आठवड्याचे विशेष जलतरण प्रशिक्षण देण्यात आले आहे.

देश – विदेशात जलतरण क्रीडा स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक अथवा अन्य पदक जिंकणारे जलतरणपटू फार कमी आहेत. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या शिक्षण खात्याकडून महापालिका शाळांमधील २०५ विद्यार्थ्यांना तीन आठवड्याचे विशेष जलतरण प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यापैकी विशेष प्राविण्य दाखवणाऱ्या ८५ विद्यार्थ्यांना पुढील वर्षभर जलतरण विषय प्रशिक्षण मोफत देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून राज्य व राष्ट्रीय स्तरावरील जलतरण क्रीडापटू घडवण्याचा प्रयत्न असल्याचे मुंबई महापालिकेच्या शाळांमधील क्रीडा विषयक जबाबदारी सांभाळणारे पर्यवेक्षक राजेश गाडगे यांनी सांगितले. ( Maharashtra news International standard swimmers will emerge from Mumbai Municipal School )

मुंबई महापालिका शिक्षण खाते सदर विद्यार्थ्यांना केवळ जलतरण प्रशिक्षण देणार नसून राज्य व राष्ट्रीय पातळीवरील जलतरण विषयक स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी या विद्यार्थ्यांना आवश्यक ते मार्गदर्शन व प्रोत्साहनदेखील देणार आहे.

- Advertisement -

जलतरण हा जसा एक महत्त्वाचा क्रीडा प्रकार आहे, त्याचप्रमाणे तो एक उत्कृष्ट व्यायाम प्रकार देखील आहे. मुंबईकर नागरिकांना विविध नागरी सेवा सुविधा देणा-या महापालिकेने आपल्या जलतरण तलावांच्या माध्यमातून जलतरण सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या आहेत. यावर्षी प्रथमच महापालिकेच्या जलतरण तलावांमध्ये ३ आठवड्यांचे जलतरण प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान मुंबई महापालिकेच्या शाळांमधील २०५ विद्यार्थ्यांना मोफत जलतरण प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात आले, अशी माहिती शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी दिली आहे. महापालिका आयुक्त इकबाल चहल, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे आणि सह आयुक्त (शिक्षण) अजीत कुंभार यांच्या मार्गदर्शनानुसार महापालिका शाळांमधील इयत्ता पाचवी ते आठवी या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी यंदा प्रथमच जलतरण विषयक प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गांमध्ये २०५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या जलतरण प्रशिक्षणासाठी आवश्यक असणारे साहित्य देखील या विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात आले होते.

( हेही वाचा: Sharad Pawar : राष्ट्रवादी सदैव कोळी बांधवांच्या पाठिशी; मच्छिमार महिलांचा NCP मध्ये प्रवेश )

- Advertisement -

जलतरण प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना २ ते २२ मे या २१ दिवसांच्या कालावधी दरम्यान तज्ज्ञ प्रशिक्षकांद्वारे जलतरण विषयक प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या २०५ विद्यार्थ्यांपैकी विशेष प्राविण्य दाखविणाऱ्या ८५ विद्यार्थ्यांना पुढील वर्षभर जलतरण विषय प्रशिक्षण मोफत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर जलतरण विषयक स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी या विद्यार्थ्यांना आवश्यक ते मार्गदर्शन व प्रोत्साहन देखील देण्यात येणार आहे, पर्यवेक्षक राजेश गाडगे यांनी कळविले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -