घरदेश-विदेशOla-Uber Fare Hike : सर्वसामान्यांना फटका, अॅप आधारीत टॅक्सीसेवेच्या भाड्यामध्ये १५ टक्क्यांपर्यत...

Ola-Uber Fare Hike : सर्वसामान्यांना फटका, अॅप आधारीत टॅक्सीसेवेच्या भाड्यामध्ये १५ टक्क्यांपर्यत वाढ

Subscribe

ओला-उबर या अॅप आधारीत टॅक्सीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. सध्या वाढत असणाऱ्या पेट्रोल-डिझेल आणि सीएनजीच्या दरवाढीमुळे ओला-उबर टॅक्सीच्या भाड्यात वाढ झाली आहे.

ओला-उबर या अॅप आधारीत टॅक्सीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. सध्या वाढत असणाऱ्या पेट्रोल-डिझेल आणि सीएनजीच्या दरवाढीमुळे ओला-उबर टॅक्सीच्या भाड्यात वाढ झाली आहे. मुंबईसह शहरांतली ओला-उबरनं 12 ते 16 टक्क्यांनी भाडेवाढ केली आहे.

सीएनजी आणि एलएनजी दरात मोठी वाढ झाल्यानं दोन्ही कंपन्यांनी भाडं 12 ते 15 टक्कयांनी वाढवलं आहे. मुंबईत ही वाढ १५ टक्के इतकी आहे. मुंबईत टॅक्सी आणि रिक्षाच्या भाडेवाढीची मागणी रिक्षा टॅक्सी चालकांच्या संघटनांनी केली आहे. महागाईच्या काळात उबेर आणि ओला या टॅक्सी कंपन्यांनी आधीच अनेक ठिकाणी भाडे वाढवले ​​आहे.

- Advertisement -

मगील काही दिवसांपासून इंधनाच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली असून वाहनचालकांना दिलासा देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. ओला आणि उबरनं गेल्या वर्षभरात दुसऱ्यांदा भाडं वाढवलं ​​आहे. याआधी गेल्या वर्षी जुलैमध्ये दोन्ही कंपन्यांनी भाडे १५ टक्क्यांनी वाढवले ​​होते.

तब्बल साडेचार महिन्यांच्या कालावधीनंतर 22 मार्चपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याची प्रक्रिया सुरू झाली. या दरम्यान 14 हप्त्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 10 रुपयांनी वाढ झाली आहे. तसंच गेल्या तीन महिन्यांत सीएनजीच्या दरात किलोमागे 15 रुपयांनी वाढ झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – चैत्यभूमीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -