घरCORONA UPDATEकोरोना बळींच्या संख्येत महाराष्ट्राने इटलीला टाकलं मागे, जागतिक क्रमवारीत ६व्या स्थानी

कोरोना बळींच्या संख्येत महाराष्ट्राने इटलीला टाकलं मागे, जागतिक क्रमवारीत ६व्या स्थानी

Subscribe

राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव सातत्याने वाढताना दिसत आहे. जरी राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असले तरी मृत्यूदर काही कमी होताना दिसत नाही आहे. जागतिक क्रमवारीत कोरोना बळींच्या संख्येत राज्य सहाव्या क्रमांकावर आहे. राज्यातील कोरोना बळींच्या संख्येने इटलीला मागे टाकले आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १८ हजार ३१७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४८१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १३ लाख ८४ हजार ४४६वर पोहोचला. यापैकी आतापर्यंत ३६ हजार ६६२ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६५ टक्के एवढा आहे.

आज दिवसभरात राज्यात १९ हजार १६३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण कोरोनामुक्ता झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७८.६१ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६७ लाख ८५ हजार २०५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३ लाख ८४ हजार ४४६ (२०.४०टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २१ लाख ६१ हजार ४४८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २९ हजार १७८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच सध्या राज्यात २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे… 

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका २६५४ २०५२६८ ४६ ८९२९
ठाणे ३२० २९५०८ ७४९
ठाणे मनपा ४७३ ३८०५२ ३६ ११४९
नवी मुंबई मनपा ४५२ ३९७८४ ८८७
कल्याण डोंबवली मनपा ५२७ ४६११३ ११ ८८०
उल्हासनगर मनपा ४० ९३०९ ३१४
भिवंडी निजामपूर मनपा ३१ ५३९८ ३४१
मीरा भाईंदर मनपा २३९ १९२१५ ५७६
पालघर १७१ १३५६९ १२ २६४
१० वसई विरार मनपा २४२ २३५०० ३० ६०७
११ रायगड ३३६ ३१०३८ ७९३
१२ पनवेल मनपा २५८ २०३४९ ३६२
१३ नाशिक ४६५ १९१९५ ४०३
१४ नाशिक मनपा ८९३ ५३२४५ १५ ७५५
१५ मालेगाव मनपा ३३ ३६८४ १४२
१६ अहमदनगर ६३९ २७५२२ ४०१
१७ अहमदनगर मनपा १२५ १४६६१ २८३
१८ धुळे ६१ ६७११   १७९
१९ धुळे मनपा ६६ ५७२९   १५०
२० जळगाव २५३ ३७२६३ ९७९
२१ जळगाव मनपा १०६ १०३९८   २६६
२२ नंदूरबार ४० ५३२८ १२०
२३ पुणे ११७९ ६१९१७ २१ १२३५
२४ पुणे मनपा १३७० १५५७१४ २८ ३५२८
२५ पिंपरी चिंचवड मनपा ७१२ ७५४३३ ३१ १०५०
२६ सोलापूर ३६८ २७२२२ ६६४
२७ सोलापूर मनपा ६४ ८९९०   ४७९
२८ सातारा ६०१ ३६८१६ २९ ९३७
२९ कोल्हापूर ३३९ ३०७७२ १५ १००२
३० कोल्हापूर मनपा ९१ १२५९० ३३८
३१ सांगली ४११ २०६०० १८ ७०८
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १४९ १७५७५ ४६८
३३ सिंधुदुर्ग ५४ ३९०२ ८४
३४ रत्नागिरी ११७ ८४३६ १३ २७८
३५ औरंगाबाद १२७ १२६९३ २३२
३६ औरंगाबाद मनपा १९६ २३३५३ ६५७
३७ जालना १३४ ७७६९   १८६
३८ हिंगोली २८ ३०४९   ५७
३९ परभणी ६२ २९४७ ९५
४० परभणी मनपा २६ २४९२ १००
४१ लातूर ११६ १०५२७ ३१७
४२ लातूर मनपा ९३ ६८५५ १६९
४३ उस्मानाबाद २५६ १२५१६ ११ ३६२
४४ बीड २१४ १०३९० २७६
४५ नांदेड १३६ ८७५९ २२२
४६ नांदेड मनपा ७१ ७१८१ १७८
४७ अकोला २२ ३३५० ८९
४८ अकोला मनपा ५२ ३८७९ १४१
४९ अमरावती ८३ ४७३५ ११७
५० अमरावती मनपा ९७ ८८११   १५६
५१ यवतमाळ १६२ ८७९९ २१९
५२ बुलढाणा १४३ ७७५७ १२२
५३ वाशिम १५० ४३०० ९२
५४ नागपूर ३१३ १८२३८ ३१२
५५ नागपूर मनपा १०३८ ५९७६१ १४ १७२३
५६ वर्धा १२७ ४२७६   ६९
५७ भंडारा १५५ ५७२३ १००
५८ गोंदिया १७७ ७१८१ ७२
५९ चंद्रपूर २२५ ५८९१ ६५
६० चंद्रपूर मनपा १४३ ४५०४   ७९
६१ गडचिरोली ६९ २३१७   १६
  इतर राज्ये /देश २३ १५८७ १३९
  एकूण १८३१७ १३८४४४६ ४८१ ३६६६२
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -