घरताज्या घडामोडीमहाराष्ट्रात ऑक्सिजन तुटवडा ! अखेर दोन राज्यांनी पुढे केला मदतीचा हात

महाराष्ट्रात ऑक्सिजन तुटवडा ! अखेर दोन राज्यांनी पुढे केला मदतीचा हात

Subscribe

महाराष्ट्रात रूग्णसंख्या वाढतानाच अनेक आरोग्य विषयक समस्यांसोबत आरोग्य यंत्रणा, राज्य सरकार आणि स्वतः रूग्णदेखील लढा देत आहेत. पण या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या आव्हानाच्या काळात महाराष्ट्राच्या आरोग्य यंत्रणेला भेडसावणारी महत्वाची अडचणी आहे ती म्हणजे रूग्णांसाठीच्या ऑक्सिजनसाठीची. महाराष्ट्राची हीच ऑक्सिजनची गरज भागवण्यासाठी आता देशातील दोन राज्यांनी मदतीचा हाथ पुढे केला आहे. गुजरात आणि छत्तीसगढ येथून महाराष्ट्राला येत्या दिवसांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे. महाराष्ट्रातील ऑक्सिजनची चणचण मिटवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणजे महाराष्ट्राच्या मदतीला आता दोन राज्यांकडून मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे.

महाराष्ट्राला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी छत्तीसगढच्या भिलाई प्लॅंटमधून विदर्भासाठी ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार आहे. तर गुजरातच्या जामनगरमधून १०० मेट्रिल टन इतका ऑक्सिजन संपुर्ण महाराष्ट्राला पुरवण्यात येणार आहे. सध्याच्या रूग्णसंख्येनुसार महाराष्ट्रात येत्या महिन्याभरात १५०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासू शकते असा अंदाज आहे. त्यामुळेच महाराष्ट्राची ही ऑक्सिजनची गरज भागवण्यासाठीच महाराष्ट्राने ऑक्सिजन मिळवण्यासाठी धडपड सुरू केली आहे. महाराष्ट्रात १२०० मेट्रिक टन ऑक्सिजन सध्या उपलब्ध आहे. या ऑक्सिजनपैकी ९६० टन ऑक्सिजन रूग्णांसाठी वापरण्यात येत आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रातील कोरोनाची टंचाई पाहता केंद्र सरकारनेही महाराष्ट्राच्या ऑक्सिजनच्या गरजेसाठी काही पावल उचलायला सुरूवात केली आहे. केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, स्टील प्लॅन्ट्स आणि रिफायनरी उद्योगांनी ऑक्सिजची गरज पुर्ण करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. हे उद्योग सुरळीत सुरू राहतानाच उद्योगांनी रूग्णांसाठीही ऑक्सिजन पुरवण्यासाठी काय करता येईल हे पाहणे गरजेचे असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे.

मंगळवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑक्सिजनची कमी झालेली पातळी पाहता, केंद्राकडेही अपिल करत ऑक्सिजन कमी पडत असल्याचे सांगितले होते. ऑक्सिजनच्या तुटवड्यासाठी केंद्रानेही मदत करावी असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले होते. तसेच ऑक्सिजनचा तुटवडा पाहता वायुसेनेने यामध्ये मदत करावी अशी मागणी त्यांनी केली होती. दुसऱ्या राज्यातून महाराष्ट्रात ऑक्सिजन आणण्याची गरज असल्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे केली होती. दूरच्या राज्यातून महाराष्ट्रात ऑक्सिजन येण्यासाठी वेळ लागू शकतो. म्हणूनच एअरफोर्सच्या मदतीने ऑक्सिजन आणला गेला, तर त्यासाठी मदत करावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -