Petrol-Diesel price : गुजरातच्या पेट्रोल पंपावर महाराष्ट्राच्या नागरिकांची गर्दी; दर पाहून तुम्हालाही बसेल धक्का

महाराष्ट्रात दिवसागणिक पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होताना पहायला मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिक गुजरातमध्ये पेट्रोल भरण्यासाठी जात आहेत. गुजरातमधील इंधनाचे दर पाहून तुम्हालाही धक्का बसेल. कारण गुजरातच्या पेट्रोल पंपावर महाराष्ट्राच्या नागरिकांची प्रचंड गर्दी होताना दिसून येत आहे. गुजरातमधील पेट्रोलचे दर महाराष्ट्रपेक्षा प्रति लिटरमागे १५ रुपयांहून अधिक कमी असल्याने वाहनधारक आता पेट्रोल भरण्यासाठी गुजरातमध्ये जात आहेत.

मागील पाच दिवसांपासून इंधनाच्या दरात चार वेळा दरवाढ झाली असून इंधन ३ रूपये २० पैशांनी महागले आहे. महाराष्ट्रात पेट्रोलचे दर हे जवळपास १२२ रूपये प्रतिलिटर आहे. तर डिझेलचे दर हे ९४ रूपये लिटरपर्यंत आहेत. दुसरीकडे गुजरात राज्यात पाहिलं असता पेट्रोलचे दर हे ९८ रूपये असून डिझेलचे दर ९२ रूपयांच्या उंचीवर गेले आहे.

१०० रूपयांच्या इंधनावर ५० रूपयांहून अधिक कर घेणाऱ्या तीन राज्यांमध्ये महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा अशा तीन राज्यांचा समावेश आहे. केंद्रीय हा २७.९ रूपये प्रति लिटर इतका निश्चित करण्यात आला आहे. तर महाराष्ट्रामध्ये २५ टक्के व्हॅटबरोबरच १०.१२ रुपये प्रति लिटर कर आकारला जात आहे.

दरम्यान, इंधनाच्या वाढत्या दराविरोधात काँग्रेस ३१ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान महागाई मुक्त भारत अभियान सुरू करणार असल्याची माहिती काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी दिली आहे. सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, मोदी सरकारने लोकांना महत्त्व न देता आपली तिजोरी भरण्याचा उद्योग सुरू केला आहे, असं म्हणत केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.


हेही वाचा : अमेरिकेत माझी कोणतीही मालमत्ता नाही, आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी फेटाळले आरो