घरमहाराष्ट्रराज्यातील नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती लांबणीवर, पुढील आठवड्यात निर्णयाची शक्यता

राज्यातील नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती लांबणीवर, पुढील आठवड्यात निर्णयाची शक्यता

Subscribe

पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारने नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकलली आहे. 1 नोव्हेंबरपासून ही भरती प्रक्रिया सुरु होणार होती. मात्र प्रशासकीय कारणास्तव ही भरती प्रक्रिया लांबणीवर पडल्याचे सांगण्य़ात येत आहे. दरम्यान 1 नोव्हेंबरपासून पोलीस विभागात तब्बल 14956 पदांसाठी भरती होणार होती. मात्र आता या प्रक्रियेला तात्पुरतया स्वरुपात स्थगिती दिली आहे. यासोबत राज्य राखीव दलातील (DRPF) पोलीस भरती प्रक्रिया देखील पुढे ढकलण्य़ात आली आहे. या भरतीबाबत आता पुढील आठवड्यात निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र अचानक ही भरती प्रक्रिया पुढे ढकलल्याने भरतीसाठी तयारी करणारे तरुण चिंतेत आले आहेत.

मात्र तरुणांनी काळजी न करता तयारी सुरु ठेवा असे आवाहन केले जात आहे. कारण याबाबत राज्य सरकार पुढील आठवड्यात निर्णय घेणार आहे. गेल्या तीन वर्षात राज्यात पोलीस भरती झाली नाही. याचा फटका हजारो तरुणांना बसला. कारण वयोमर्यादा संपल्यामुळे अनेकजण पोलीस भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरत नाहीत. अशा तरुणांवर कोणताही अन्यान न करता त्यांना संधी देण्यासाठी ही पोलीस भरती प्रक्रियेला थोड्या काळासाठी स्थगिती देण्यात आल्याची माहिती समिती आणि सरकारकडून समोर येत आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात पोलीस भरतीची जाहिरात निघाल्यानंतर वयोमर्यादा वाढवली जाण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

कोणत्या प्रवर्गाला किती जागा?

अनुसूचित जाती 1811, अनुसूचित जमाती 1350, विमुक्त जाती (अ) 426, भटक्या जमाती (ब) 374, भटक्या जमाती (क) 473, भटक्या जमाती (ड) 292, विमुक्त मागास प्रवर्ग 292, इतर मागास वर्ग 2926, इडब्लूएस 1544, खुला 5468 जागा अशा एकूण 14956 जागा भरल्या जाणार आहेत.

कुठे किती जागा आहेत?

मुंबई – 6740
मिरा भाईंदर – 986
ठाणे शहर – 521
पुणे शहर – 720
लोहमार्ग मुंबई – 620
पुणे ग्रामीण – 579
नाशिक ग्रामीण – 454
गडचिरोली – 348
अकोला – 327
नागपूर शहर – 308
पिंपरी चिंचवड – 216
नवी मुंबई – 204
रायगड -272
पालघर – 211
रत्नागिरी – 131
अहमदनगर – 129
यवतमाळ – 244
लोहमार्ग पुणे – 124
लोहमार्ग औरंगाबाद -154
सातारा – 145
चंद्रपूर – 194
नांदेड – 155
अमरावती ग्रामीण – 156
गोंदिया – 172
नागपूर ग्रामीण – 132
धुळे – 42
कोल्हापूर – 24
सोलापूर ग्रामीण – 26
औरंगाबाद ग्रामीण- 39
अमरावती शहर – 20
सोलापूर शहर- 98
ठाणे ग्रामीण – 68
सिंधूदुर्ग – 99
परभणी – 75
हिंगोली – 21
भंडारा – 61
वर्धा – 90
बुलढाणा – 51

- Advertisement -

एकूण – 14956


महिलांच्या प्रजनन अधिकारांवरील वयाच्या मर्यादेविरोधातील याचिकेवर सुप्रीम कोर्टाची केंद्राला नोटीस

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -