राज्यात २४ तासांत ५५ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाचीबाधा

राज्यात २४ तासांत तब्बल ५५ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाचीबाधा झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा १ हजार ३२८ वर गेला आहे.

maharashtra police total positive cases death toll
राज्यात २४ तासांत ५५ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाचीबाधा

कोरोना विषाणूने राज्यात आपला विळखा अधिक घट्ट केला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. या कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी पोलीस प्रशासन अहोरात्र मेहनत घेत आहेत. या सगळ्या धावपळीच्या जीवनात मात्र पोलिसांना देखील आता कोरोनाची बाधा होत आहे. राज्यात २४ तासांत तब्बल ५५ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाचीबाधा झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा १ हजार ३२८ वर गेला आहे. त्यात १३६ अधिकाऱ्यांचा समावेश असून आतापर्यंत कोरोनामुळे १२ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर ३२४ पोलीस पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत.

देशभर पसरणाऱ्या कोरोनाची दोन हात करण्यासाठी पोलीस प्रशासन याही परिस्थितीत आपले कर्तव्य चोख बजावत आहेत. मात्र, चिंतेची बाब म्हणजे लॉकडाऊनच्या वेळी कामावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झपाट्याने होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन चिंतेत आहे.

महाराष्ट्रात अधिक कोरोना रुग्ण

महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा ३३ हजारांपेक्षा अधिक झाला आहे. तर आतापर्यंत १ हजार ९९८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा २० हजारहून अधिक आहे. तर ७३४ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – संगमनेरमध्ये करोना संशयिताचा मृत्यू