Live Update : एसटी कर्मचा-यांना सरकारकडून पुन्हा देण्यात आले आश्वासन

Live update Maharashtra Politics Maharashtra politics CM Eknath Shinde Deputy CM Devendra Fadnavis Uddhav Thackeray Khed Sabha Shiv Sena Thackeray group BJP Congress NCP MNS Sports IND VS AUS Cricket Kusti

सत्तासंघर्षाच्या सुनावणीला सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू

सत्तासंघर्षावरील आजची सुनावणी संपली

पक्षात फूट पडली नसून पक्षांतर्गत नाराजी : कौल

७ अपक्षांच्या पत्रावर न्यायालयात चर्चा

शिंदे गटच खरी शिवसेना, कौल यांचा युक्तीवाद

न्यायाधीश हिमा कोहली यांचा सवाल

30 जूनपर्यंत एकच पक्ष होता, सर्वजण त्याच पक्षाच्या तिकीटावर निवडून आले

अपात्रतेची तलवार असतानाही आमदार मतदान करू शकतात?

सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा कौल यांना सवाल

शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांचा युक्तीवाद

अपात्रतेचा निर्णय अपेक्षित असतानाही बहुमत चाचणी गरजेचं

सध्याचं प्रकरण हे केवळ पक्षांतर्गत नाराजीचं – नीरज कौल

तुम्ही शिवसेना आहात की नाही हे विधिमंडळात ठरू शकत नाही-चंद्रचूड

बोम्मई प्रकरणात महाराष्ट्रापेक्षा वेगळी परिस्थिती- चंद्रचूड

अभिषेक मनु सिंघवी हे पुढील ४५ मिनीटे युक्तीवाद करणार

पक्ष फुटीवर राज्यपालांनी निर्णय घेतला, मग कोर्ट निर्णय का घेऊ शकत नाही : सिंघवी

सुप्रीम कोर्टाने राज्यपालांविरोधात अनादर नोटीस काढावी : सिंघवी

तुम्ही शिवसेना नाही, असे पत्र राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना लिहीले होते

शपथ देण्यासाठी राज्यपालांनीच आमंत्रण दिल्याचा सिंघवींचा युक्तीवाद

२७ जून २०२२ ची स्थिती पुन्हा बहाल करावी : सिंघवी

जुन्या अध्यक्षांकडे प्रकरण सोपवण्याचा सिंघवी यांचा युक्तिवाद

अधिवेशन सुरु असताना देखील व्हीप जारी केला जातोय

१० व्या सूचीतील अधिकारांची कक्षा ठरवावी : सिंघवी

सरकार सत्तेत असताना बहुमत चाचणीबाबत राज्यपालांचे अधिकार काय : सरन्यायाधीश चंद्रचूड

ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांच्या युक्तिवादाला सुरुवात

व्हीप ठरवणं हे अध्यक्षांचं काम नव्हे : देवदत्त कामत

या प्रकरणात वारंवार घटनेची पायमल्ली; देवदत्त कामत यांचा सुप्रीम कोर्टात युक्तीवाद

शिंदे आणि आमदारांनी सर्वप्रथम व्हिपचं उल्लंघन केलं : कामत

शिंदे गटाने युक्तीवाद उद्यापर्यंत संपवावा : सरन्यायाधीश

याच आठवड्यात प्रकरण संपवायचं आहे : सरन्यायाधीश

शिवसेनेचे वकील नीरज कौल यांच्या युक्तीवादाला सुरुवात

बहुमत चाचणी घेणं हे राज्यपालांचे कर्तव्य : नीरज कौल

आमदारांनी विधिमंडळात बहुमतात निर्णय घेतले; कौल यांचा युक्तिवाद

सरकार हे लोकांशी संबंधीत असते, आमदारांशी नाही : कौल

आमदारांना मतदान करता आलं कारण अपात्रतेचा निर्णय झाला नाही : सरन्यायाधीश यांचा कौल यांना प्रश्न

सरकार अस्थिर कारण्यामागच्या कारणांचा विचार व्हावा : सरन्यायाधीश


सीबीआयविरोधात मनीष सिसोदिया सर्वोच्च न्यायालयात

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सीबीआयच्या तपासाविरोधात सर्वोच्च न्यायालयात घेतली धाव

मनीष सिसोदिया यांच्याकडून अभिषेक मनु सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायलयात तत्काळ सुनावणीची मागणी


नवाब मलिकांच्या जामिनावर बुधवारी दुपारी होणार सुनावणी

उद्या दुपारी १२.४५ वाजता सोनार सुनावणी


पुण्यात बुधवारी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे राज्यव्यापी आंदोलन

एमपीएससी तांत्रिक विभागाच्या परीक्षेचा पॅटर्न 2025 पासून लागू करण्यासाठी विद्यार्थी करणार आंदोलन

राज्यभरातील विद्यार्थी उद्या पुण्यात आंदोलनासाठी येणार


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लहान भाऊ प्रल्हाद ,मोदी रुग्णालयात दाखल

किडनी संबंधित आजारावरील उपचारासाठी रुग्णालयात दाखल


रायगडमध्ये शेकापला आणखी एक धक्का

पेण मतदारसंघातील शेकापचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांचा भाजप प्रवेश

मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालय येथे पक्ष प्रवेश

आज दुपारी 3 वाजता करणार भाजपात पक्ष प्रवेश


खारकोपर स्थानकाजवळील रुळावर लोकलचे तीन डबे घसरले


शिवसेना म्हणून मान्यता मिळाल्याने आम्ही व्हिप बजावू शकतो – भरत गोगावले


ठाकरे तळीरामांचं सरकार चालवत होतं – आशिष शेलार

एसटी कर्मचाऱ्यांबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेईल

ठाकरे गटाला अधिकृत मान्यता आहे, असा कोणता गट आहे हा प्रश्न आहे

राज्याच्या प्रचलित निर्णयानुसार एकच शिवसेना पक्ष आहे, दुसरा पक्ष अस्तित्वात आहे का, असा कायदेशीर प्रश्न आहे – आशिष शेलार


तृणमूल काँग्रेसचे अधिकृत ट्विटर खाते हॅक, फोटो आणि नाव बदलले


निवडणूक आयोगाचा निर्णय घटनाबाह्य – अरविंद सावंत


गुजरातच्या वलसाडमध्ये जीआयडीसी कंपनीत मोठी आग, स्फोटामुळे इमारत कोसळली


महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च सुनावणी


अधिवेशनाचा दुसरा दिवस


नवाब मलिकांच्या जामिनावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी