बाळासाहेबांचं हिंदुत्व पुढे नेणार, माझ्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार – एकनाथ शिंदे

Maharashtra political crisis eknath shinde shivsena 35 mla airlift surat guvahati surat airport guwahati airport

महाराष्ट्राच्या राजकारणात मंगळवारी सकाळपासून सुरु झालेल्या राजकीय भूकंपाचे झटके अजूनही सुरुचं आहेत. शिवसेनेचे नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडले असून माझ्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार आहेत, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पुढे घेऊन जाणार असा दावा एकनाथ शिंदे यांनी आसाममध्ये केला आहे. (Maharashtra political crisis eknath shinde shivsena 35 mla airlift surat guvahati surat airport guwahati airport)

सोमवारी रात्री मुंबईतील निघून गुजरातच्या सुरतमध्ये ३५ आमदारांसह दाखल झालेले एकनाथ शिंदे समर्थक आमदारांना मध्यरात्री विशेष विमानाने आसामला नेण्यात आले. बुधवारी सकाळी गुवाहाटी विमानतळावर उतरताच दोन वेगवेगळ्या बसमधून शिंदे यांच्यासह आमदारांना नेण्यात आले.

विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी, “माझ्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार असून शिवसेना प्रमुखांचे हिंदुत्व मी पुढे घेऊन जाणार, गर्व से कहो हम हिंदु है,” असा नाराही त्यावेळी देण्यात आला.

एकनाथ शिंदेंसोबत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील शिवसेनेचे आमदार आहेत. तसेच शिवसेना पुरस्कृत प्रहार पक्षाचे आमदार आणि राज्यमंत्री बच्चू कडू आणि राजकुमार पटेलही आहेत.


एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल