…. अन्यथा फडणवीसांच्या प्रतिष्ठेला धक्का बसेल, संजय राऊतांचा इशारा

ग्रेस आणि राष्ट्रवादी मजबुतीने आमच्या पाठिशी ठाम उभे आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारं हे सगळं घडतंय'', असही राऊत म्हणाले

shiv sena ownership dispute Sanjay Raut given list of evidence shiv sena ownership

देवेंद्र फडणवीसांना सल्ला देतो की, तुम्ही या फंदात पडू नका, जे पहाटे झालं ना ते आता सायंकाळी होईल, फडणवीसांनी या झमेल्यात पडू नये. भाजपची उरलीसुरली प्रतिष्ठा ते यात गमावून बसतील. त्यांच्या नेतृत्वाला धक्का बसेल”, अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे.
ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

“जरी ते आमचे राजकीय विरोधक असले तरी तरी त्यांच्याविषयी आम्हाला प्रेम आहे. आमचं आम्ही बघून घेऊ, तुम्ही मध्ये पडू नका,” असा सल्ला संजय राऊतांनी फडणवीसांनी दिला आहे.

शिवसेनेला सहजासहजी कोणी हायजॅक करु शकत नाही

शिवसेना पक्ष खूप मोठा आहे. राज्यात आणि देशात शिवसेनेला मोठं करण्यात बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शिवसेना कार्यकर्ते घाम गाळला आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाला सहजासहजी कोणी हायजॅक करु शकत नाही, विचार पण करु नका, हा पक्ष अनेकांचे रक्त सांडून निर्माण झाला आहे. या पक्षासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे”, असही राऊत म्हणाले.

“राष्ट्रीय कार्यकारिणी कोणत्याही पक्षासाठी महत्त्वाची गोष्ट असते. आजची कार्यकारिणीची बैठकही महत्वाची आहे, या कार्यकारिणीत अनेक निर्णय घेतले जातील, पक्षाच्या वर्तमान आणि भविष्याबद्दल विचार मंथन केले जाईल. पक्षाच्या विस्तारीकरणारवर विचार केला जाईल. नियुक्त्या केल्या जातील,” अशी माहिती राऊत यांनी दिली.

“कोणाकडे पैसा आहे. त्या पैशाच्या जोरावर कोणी पक्ष खरेदी करु शकत नाही. राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये या सर्व गोष्टींवर चर्चा होईल. मोठे विधायक निर्णय घेतले जातील. जे संकट आता आले आहे त्याला आम्ही संकट मानत न मानता एक संधी मानतो, यातून शिवसेना पक्षाच्या विस्तारीकरणासाठी मोठी संधी निर्माण झाली आहे, मात्र जे झालं त्याचा नक्की विचार केला जाईल” असा विश्वासही राऊतांनी दिला आहे.

“आज हजारो शिवसैनिक आमच्या पाठिशी उभे आहेत. पैसा, दहशतवादाच्या जीवावर आम्हाला कोणी विकत घेऊ शकणार नाही. आता माझ्याकडं सांगली आणि मिरजेहून शिवसैनिक आलेत, ही पक्षाची मोठी आणि खरी ताकद आहे. शिवाय, काँग्रेस आणि राष्ट्रवादी मजबुतीने आमच्या पाठिशी ठाम उभे आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारं हे सगळं घडतंय”, असही राऊत म्हणाले.


गुजरात दंगलीला नेहमीच राजकीय नजरेतून पाहिले गेले, मी मोदींचे दु:ख जवळून पाहिले – अमित शाह