घरमहाराष्ट्रमहाराष्ट्रात राजकीय भूकंपानंतर आता भाजप ताकही फुंकून पितेय, आमदारांनी बाळगले मौन

महाराष्ट्रात राजकीय भूकंपानंतर आता भाजप ताकही फुंकून पितेय, आमदारांनी बाळगले मौन

Subscribe

दरम्यान भाजपचे नेते मात्र या बैठकीवर काहीही बोलणे टाळत आहेत. मात्र या बैठकीनंतरच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 37 आमदारांच्या सह्यांचे पत्र उपसभापती आणि राज्यपालांना पाठवून स्वत:च नेता निवडण्याबाबत बोलल्याचे मानले जात आहे

महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगाच्या काळात देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या भाजपने पूर्णपणे मौन बाळगले आहे . मात्र या राजकीय गोंधळामागे भाजपचा हात असल्याचा आरोप आता शिवसेना आणि मित्रपक्ष करत आहेत. गुजरात आणि आसाम या भाजपशासित राज्यांमध्ये शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोर आमदारांना ज्या पद्धतीने ठेवण्यात आले, त्यावरून महाविकास आघाडीचे नेते सातत्याने भाजपवर निशाणा साधत आहेत. मात्र त्यानंतरही भाजपचे नेते उघडपणे काहीही बोलत नसून हा सगळा वाद शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगत आहेत.

यावर भाजपच्या सुत्रांच्या माहितीनुसार, जोपर्यंत बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी असल्याची पूर्ण खात्री होत नाही आणि हे सर्व ऑन रेकॉर्ड येत नाही, तोपर्यंत भाजप पुढे पाऊल उचलत नाही. यावरून भाजप सध्या ताकही फुंकून पित असल्याचे दिसतेय आहे. जेणेकरून याधी झालेल्या चुका पुन्हा होऊ नये. . यावेळीही कैलास पाटील आणि नितीन देशमुख हे दोन आमदार बंडखोर होऊन माघारी गेल्याने भाजपच्या नेत्यांमध्ये भीती आहे. नंतर ही संख्या आणखी वाढू नये, म्हणून शिंदे यांच्या बाजूने प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर बंडखोर आमदारांची संख्या वाढवण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे.

- Advertisement -

दुसरीकडे शिंदे गटामध्ये गेलेल्या बंडखोर आमदारांपैकी 10 ते 12 आमदार त्यांच्या संपर्कात असल्याचा दावाही शिवसेनेकडून केला जात आहे. विश्वासदर्शक ठरावावेळी ते उद्धव ठाकरेंना वेळ आल्यावर साथ देतील. भूतकाळातील अनुभव पाहता भाजपला सध्या कोणतीही घाईची पावले उचलायची नाहीत. त्यामुळे भाजप वेट अँड वॉचच्या रणनीतीवर काम करत आहे. मात्र, या संपूर्ण घडामोडींवर भाजपचे नेतृत्व सातत्याने लक्ष ठेवून आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने दिल्लीच्या सूचनेनुसार रणनीती आखत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेले आणि रात्री उशिरापर्यंत एकत्र मुंबईत परतले.

दरम्यान भाजपचे नेते मात्र या बैठकीवर काहीही बोलणे टाळत आहेत. मात्र या बैठकीनंतरच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 37 आमदारांच्या सह्यांचे पत्र उपसभापती आणि राज्यपालांना पाठवून स्वत:च नेता निवडण्याबाबत बोलल्याचे मानले जात आहे. मात्र उपसभापती हे राष्ट्रवादीचेच असल्याने तेथेही भाजपचे नेते धास्तावले आहेत. आता ही राजकीय लढाई सत्तेसोबतच खरी शिवसेना पक्ष काबीज करण्याच्या दिशेने जात असल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपला सरकार स्थापनेचा पूर्ण विश्वास असेल तेव्हाच या लढतीत उतरेल. त्यामुळे आधी झालेल्या चुका सुधारत आता नवी राजकीय खेळी आखत भाजप काम करत आहे.


माझं मुख्यमंत्रिपद मान्य नसणं ही राक्षसी महत्त्वाकांक्षा, उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -