Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र पुणे चिंचवड पाठोपाठ कसब्यातही बॅनरबाजी; "कसबा गाडगीळांचा, बापटांचा, टिळकांचा..."

चिंचवड पाठोपाठ कसब्यातही बॅनरबाजी; “कसबा गाडगीळांचा, बापटांचा, टिळकांचा…”

Subscribe

पुणेरी पाट्या तुम्ही अनेकदा वाचल्या असतील, पुण्यात गेल्यावर चौकाचौकात तुम्हाला या पाट्या कधीतरी तुम्ही वाचल्या असतील. आता पुणे शहर पाट्यांसाठी नव्हेतर बॅनरबाजीसाठी चर्चेत येत आहे.

पुणेरी पाट्या तुम्ही अनेकदा वाचल्या असतील, पुण्यात गेल्यावर चौकाचौकात तुम्हाला या पाट्या कधीतरी तुम्ही वाचल्या असतील. आता पुणे शहर पाट्यांसाठी नव्हेतर बॅनरबाजीसाठी चर्चेत येत आहे. पुण्यातील चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूक सध्या प्रचंड चर्चेची आणि प्रतिष्ठेची ठरत आहे. एकीकडे चिंचवडमद्ये शिवसेनेचे राहुल कलाटे यांच्या बंडखोरीनंतर बॅनर्स झळकू लागले आहेत. “एका अपक्षाची गद्दारी खोक्यातून, नागपूरची गुलामी, ठाण्याची गद्दारी एकदम ओक्के डोक्यातून- खरा शिवसैनिक ‘ अशा अशायाचे हे बॅनर्स आहेत.” त्यापाठोपाठ आता कसबा मतदारसंघातही बॅनरबाजी सुरू झाली असून या बॅनर्समुळे चर्चांना उधाण आलंय.

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवरून सध्या राज्याचं राजकारण चांगलच तापलं आहे. पुण्यातल्या कसबा आणि चिंचवडमध्ये महाविकास आघाडीने दिलेल्या उमेदवारावरून सुरू झालेलं नाराजीनाट्य आता बॅनरबाजीमधून झळकू लागलंय. सुरूवातीला चिंचवड मतदारसंघात अर्ज दाखल करायला काही अवधी शिल्लक असताना महाविकास आघाडीकडून नाना काटे यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे शिवसेनेचे राहुल कलाटे नाराज झाले. त्यांनी अपक्ष म्हणून शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. या शक्तिप्रदर्शनामुळे महाविकास आघाडीचे टेन्शन वाढलं. पण पक्षप्रमुखांच्या फोननंतरही राहुल कलाटे यांनी आपला अपक्ष उमेदवारीचा अर्ज मागे घेतला नाही. त्यावरून आता चिंचवडमद्ये राहुल कलाटेंच्या बंडखोरीवर शिवसैनिकांनी बॅनरबाजी केली. त्यापाठोपाठ आता कसब्यातही बॅनरबाजीला सुरूवात झालीय.

- Advertisement -

कसब्यात मुक्ता टिळक यांचे निधन झाले, पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यामुळे ब्राह्मणांच्या या मतदारसंघात ब्राह्मणच उमेदवार दिला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, भाजपने तसं न करता यावेळी ओबीसी कार्ड बाहेर काढले. ओबीसी समाजाचे राक्षे यांना उमेदवारी जाहीर केली. भाजपच्या या निर्णयाला थोड्या फार प्रमाणात विरोधी झाल्याचे पहायला मिळाले. भाजपने शैलेश किंवा कुणाल टिळक यांच्याऐवजी टिळक कुटूंबियांच्या बाहेरील हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. त्यामुळे या मतदारसंघात इथला ब्राम्हण समाज नाराज झाला. ­तब्बल पाच वेळा या मतदारसंघातून भाजपचे गिरीश बापट निवडून आले आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून रोहित टिळक यांनाच मैदानात उतरवले जात होते. गिरीश बापट हे खासदारकीला उभे राहिले त्यानंतर हा मतदारसंघ कोण लढवणार याची चर्चा सुरू झाली. बापट यांच्यानंतरही कसबा मतदारसंघ ब्राह्मण उमेदवारांच्या हाती असावा अशी रचना होती. त्यामुळेच पुण्याच्या तत्कालीन महापौर आणि दिवंगत नेत्या मुक्ता टिळक यांचे नाव पुढे आले. भाजपने त्यांना उमेदवारी दिली आणि त्या निवडूनही आल्या. त्यांच्यानंतरही इथे टिळकच असावा, अशी इच्छा इथल्या मतदारांना होती. परंतू हेमंत रासने यांना उमेदवारी मिळाल्यानं आता ब्राम्हण समाजाची नाराजी बॅनमधून झळकू लागली आहे.

“आमचेही ठरले आहे, धडा कसा शिकवायचा…कसबा हा गाडगीळांचा, कसबा हा बापटांचा…, कसबा हा टिळकांचा, का काढला आमच्याकडून कसबा, आम्ही दाबणार नोटा” अशा आशयाचे बॅनर कसब्यात झळकू लागले आहेत. या बॅनरमुळे राजकारण तापले आहे. तसंच ब्राम्हण समाजाची नाराजी उघड उघड दिसून आली आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -