घरताज्या घडामोडीपक्षनेतृत्वावरील नाराजीमुळे ठाणे जिल्ह्यात शिवसेनेच्या आणखी एका पदाधिकाऱ्याचा राजीनामा

पक्षनेतृत्वावरील नाराजीमुळे ठाणे जिल्ह्यात शिवसेनेच्या आणखी एका पदाधिकाऱ्याचा राजीनामा

Subscribe

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी आणि काही खासदारांनी बंडखोरी केली. त्यानंतर राज्यभरातील अनेक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देते शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेते उभी फुट पडली आहे. अशातच ठाण्यातील आणखी एका शिवसैनिकाने राजीनामा दिला आहे.

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी आणि काही खासदारांनी बंडखोरी केली. त्यानंतर राज्यभरातील अनेक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देते शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेते उभी फुट पडली आहे. अशातच ठाण्यातील आणखी एका शिवसैनिकाने राजीनामा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे ठाणे जिल्हा ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी राजीनामा दिला आहे. शिवसेना पक्षनेतृत्वावर नाराजी व्यक्त करत प्रकाश पाटील यांनी राजीनामा दिला आहे. (maharashtra political resignation of shivsena leader in thane district displeasure with party leadership)

पडघा येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश पाटील यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडात भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे सहभागी झाले. त्यात माझा कोणताही सहभाग नव्हता. मात्र तरिही पक्ष नेतृत्वासह पदाधिकाऱ्यांकडून संशय व्यक्त केला जात आहे. तसेच, अविश्वास व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आपण व्यथित असून तब्बल 35 वर्षे शिवसेना संघटनेत शाखा प्रमुख ते जिल्हाप्रमुख पदापर्यंत काम करीत असताना पक्ष संघटना वाढीसाठी निस्वार्थ प्रयत्न केले. सध्या पक्ष नेतृत्वाकडून संघटनेच्या कामातून आपणास खड्यासारखे बाजूला करण्याचे प्रयत्न काही हितशत्रू पक्ष नेतृत्वाच्या साथीने करीत आहेत. त्यामुळे अपमानित होऊन संघटनेत राहण्यापेक्षा स्वाभिमान जपत राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे”, अशी घोषणा केली.

- Advertisement -

प्रकाश पाटील यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर ठाण्यात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. मात्र, शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीण जिल्हाप्रमुख आणि पदाधिकारी म्हणून राजीनामा दिल्यानंतर आता प्रकाश पाटील कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत माहिती मिळालेली नाही.

दरम्यान, आज राज्यातील नव्या शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे. मागील 38 दिवस रखडलेला विस्तार मंगळवारी सकाळी 11 ला राजभवनवर होणार आहे. राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देणार आहेत. या मंत्रिमडळासाठी शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी 9 – 9 आमदार शपथ घेतील असे सांगितले जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा –  सरकार स्थापनेच्या 39 व्या दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार; राजभवनात होणार शपथविधी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -