घरमहाराष्ट्रकुठं लावलाय हा बॉम्ब पेंग्विनच्या... की घरकोंबड्याच्या ....; राऊतांच्या पोस्टची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

कुठं लावलाय हा बॉम्ब पेंग्विनच्या… की घरकोंबड्याच्या ….; राऊतांच्या पोस्टची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

Subscribe

राज्य विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत नागपूरात दाखल झाले आहेत. दरम्यान अधिवेशनावर भाष्य करताना संजय राऊत यांनी नागपूरात सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारविरोधात बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा दिला. याबाबत आज राऊतांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ज्यामुळे ते चांगलेच ट्रोल होत आहे.

संजय राऊत यांनी नागपूरात अधिवेशनासाठी दाखल होण्यापूर्वी उद्धव ठाकरे आणि मी बॉम्ब फोडणार असल्याचे विधान केले होते. त्यानंतर कर्नाटक महाराष्ट्र सीमावादावर आज विधिमंडळात उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका मांडली. ठाकरेंच्या या भूमिकेनंतर संजय राऊत यांनी फेसबुकवर शुभ प्रभात म्हणत सुतळी बॉम्ब आणि अगरबत्तीचा फोटो शेअर केला आहे, त्यांनी ही पोस्ट आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहे.

- Advertisement -


मात्र संजय राऊत या पोस्टमुळे सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होत आहेत. या पोस्टवर काहींनी फुसका बॉम्ब असल्याचे म्हणत ठाकरे गटावर निशाणा साधला आहे तर काहींनी आदित्य ठाकरें यांच्यावरही जहरी टीका केली आहे.

कुठं लावलाय हा बॉम्ब पेंग्विनच्या ढुंगणामागे की घरकोंबड्याच्या ढुंगणामागे अशा शब्दात युजर्सनी राऊतांच्या पोस्टची खिल्ली उडवली आहे. तर साहेबांचा सुतळी बॉम्ब फुटणार आणि शिल्लक आमदार खासदार शिंदे गटात जाणार. दुपारी 1 वाजता सकाळ होते का? असा सवालही एका युजर्सने उपस्थित केला आहे.

- Advertisement -

गद्दार शिउठबा गटाला बाण वर्मी लागला म्हणून रात्री 12 वाजता कोमटपाणी सम्राट नागपुरात दाखल झाले आणि उसनं अवसान आणून बोंब फोडणार असं ओरडू लागले #राष्ट्रवादी_ची _शिवसेना, अशी जहरी कमेंटही एका युजरने केली आहे.

तर अशीच आमच्या बाळासाहेबांची शिवसेना जाळत आणली आहे… एक दिवशी स्फोट नक्कीच करणार तुम्ही… संपवणार सगळं. हा बॉम्ब तुमच्या बुडाखाली लावला पाहिजे म्हणजे तुमचं तोंड बंद होईल. असही एका युजरने लिहिले आहे.


कर्नाटक वादावर बोलणाऱ्यांनीच योजना बंद केल्या, मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना टोला

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -