पत्राचाळ घोटाळा प्रकरण : संजय राऊत यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. संजय राऊत यांची आज ईडीची कोठडी संपली असून, त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते.

belgaum court has issued summons to sanjay raut for making provocative speech belgaum

पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. संजय राऊत यांची आज ईडीची कोठडी संपली असून, त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयातील सुनावणीदरमन्यान त्यांना 14 दिवसांची म्हणजेच 22 ऑगस्टपर्यत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. (maharashtra political shiv sena mp sanjay raut get judicial custody in patra chawl scam)

संजय राऊतांचा मुक्काम अर्थर रोड तुरुंगात

न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे आजपासून संजय राऊतांचा मुक्काम अर्थर रोड तुरुंगात असणार आहे. विशेष म्हणजे न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे संजय राऊत यांना जामीनासाठी अर्ज दाखल करता येणार आहे. यासाठी राऊतांच्या वकिलांकडून प्रयत्न केले जातील. त्यामुळे आता संजय राऊतांना जमीन मिळणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

न्यायालयीन सुनावणीवेळी संजय राऊत यांच्या वकिलांनाकडून यावेळी न्यायालयीन कोठडीतही संजय राऊत यांना ईडीच्या कोठडीप्रमाणेच घरचं जेवण, औषधं घेण्याची परवानगी आणि हवेशीर खोली दिली जावी अशी मागणी केली. त्यावर कोर्टानं याबाबत आर्थर रोड तुरुंग प्रशासनाशी बोलून घेण्यास सांगितलं आहे.

पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीने 31 जुलै रोजी संजय राऊत यांना अटक केली होती. या घोटाळ्याप्रकरणी 4 ऑगस्ट रोजी न्यायालयात सुनावणी झाली होती. त्यावेळी त्यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली होती.

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी 31 जुलै रोजी ईडीकडून अटक

संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी 31 जुलै रोजी ईडीने अटक केली. त्यापूर्वी सुरूवातील सकाळी संजय राऊतांच्या घरी ईडीने छापेमारी केली. यामध्ये काही कागदपत्रे ईडीच्या हाती लागली. त्यानंतर ईडीने संजय राऊतांना ताब्यात घेत, दक्षिण मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशीसाठी नेले होते. त्यानंतर काही तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली.


हेही वाचा –  त्यांच्या बापजाद्याने 50 खोके पाहिले नसतील; शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर खडसेंचा हल्लाबोल