घरमहाराष्ट्रMaharashtra Politics : अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसला 'या' व्यक्तीवरही शाश्वती नाही

Maharashtra Politics : अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसला ‘या’ व्यक्तीवरही शाश्वती नाही

Subscribe

मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी (12 फेब्रुवारी) काँग्रेस सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. तसेच येत्या दोन दिवसांमध्ये मी माझी पुढील राजकीय दिशा स्पष्ट करेल, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी राजीनाम्यानंतर माध्यमांशी बोलताना दिली. यानंतर अशोक चव्हाण हे आजच भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे समोर येत आहे. अशातच माहिती समोर येत आहे की, काँग्रेस हायकमांडला बाबा सिद्दिकी यांचे सुपुत्र झिशान सिद्दिकी यांच्याबाबत काँग्रेसला शाश्वती नाही. (Maharashtra Politics After Ashok Chavan resignation Congress has no guarantee on Zeeshan Siddiqui either)

हेही वाचा – Jalgaon : पैशांच्या देवाणघेवाणीतून आधी राडा नंतर तुफान दगडफेक; परिसराला छावणीचं स्वरुप

- Advertisement -

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदार हे काही दिवसांपूर्वीच बँक घोटाळ्यात दोषी आढळल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. तसेच यापूर्वी दक्षिण मुंबईचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर अगदी दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला. अशातच आता अशोक चव्हाण यांनी सोमवारी (12 फेब्रुवारी) काँग्रेस सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर आता काँग्रेसमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. हायकमांडने प्रदेश काँग्रेसला बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी साडे सात वाजता मुंबईत प्रदेश काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

अशोक चव्हाणांसोबत आणखी किती नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत, याचा वेध या बैठकीत घेण्यात येईल. अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमधून आणखी काही मोठी नावं पक्षाला सोडचिठ्ठी देऊ शकतात अशा चर्चांनी जोर धरला होता. त्यामुळे आता पक्षश्रेष्ठीसुद्धा यामध्ये जातीने लक्ष घालताना दिसत आहेत. मात्र दोन दिवसांपूर्वीच बाबा सिद्दिकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केल्यामुळे त्यांचे सुपुत्र, झिशान सिद्दिकीबाबत काँग्रेसला शाश्वती नसल्याचे समोर येत आहे. झिशान सिद्दीकी हे युवा फळीतील महत्त्वाचे नाव आहेत. त्यामुळे सध्या त्यांच्या नावाचीही बरीच चर्चा सुरू आहे. या सर्व विषयांवर आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Sanjay Raut : “शिवसेना फुटीच्या वेळीच कॉंग्रेसही फुटणार होती”, संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

आपण काँग्रेससोबतच राहणार

दरम्यान, वांद्रे पश्चिमचे आमदार बाबा सिद्दीकी यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतर त्यांचे सुपुत्र झिशान सिद्दीकी यांनी माध्यमांशी बोलताना आपण कॉंग्रेससोबतच राहणार असल्याचे म्हटले आहे. आपला कॉंग्रेसमध्ये रहाण्याचा विचार आहे. आपण काही टर्म संपण्याची वाट पाहातोय, असा विचार करू नका असेही त्यांनी स्पष्ट केले होते. तसेच झिशान सिद्दीकी काँग्रेसचा राजीनामा देणार का? असा प्रश्न बाबा सिद्दीकी यांना राजीनाम्यानंतर विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले की, झिशान सिद्दीकी हे समजूतदार आहेत. त्यांना चांगली समज आहे. त्यामुळे त्यांचा निर्णय ते स्वत: घेतील.

अशोक चव्हाण भाजपाच्या वाटेवर 

अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर दोन दिवसांत राजकीय भूमिका स्पष्ट करेन, असं त्यांनी म्हटले होते. मात्र आज माध्यमांसमोर येत आपण भाजपात प्रवेश करणार असल्याचे सांगितले आहे. आज दुपारी 12.30 च्या दरम्यान भव्य पक्षप्रवेश ते करणार आहेत. या पक्षप्रवेशावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मुंबई येथील भाजपाच्या कार्यालयात हा पक्षप्रवेश केला जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -