Tuesday, March 25, 2025
27 C
Mumbai
Homeमहाराष्ट्रMaharashtra Politics : अजित पवार गटाने शरद पवारांचे आरोप फेटाळले, म्हणाले आमचीच बदनामी...

Maharashtra Politics : अजित पवार गटाने शरद पवारांचे आरोप फेटाळले, म्हणाले आमचीच बदनामी…

Subscribe

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. निवडणूक आयोग आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर शरद पवार गटाकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने याचिकाही दाखल केली आहे. परंतु, आगामी लोकसभा निवडणुकीच्या मुद्द्यावरून आता या दोन्ही गटात संघर्ष पेटलेला पाहायला मिळत आहे. कारण बारामतीत अजित पवारांना विरोध करणाऱ्या लोकांना धमकावले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीच हा आरोप केल्याने आता खळबळ उडाली आहे. (Maharashtra Politics : Ajit Pawar group rejects Sharad Pawar’s allegations)

हेही वाचा… Politics : युगेंद्र असो वा जोगेंद्र, निवडणुकीपूर्वी महाभूकंप होईल; मिटकरींचा दावा

काही दिवसांपूर्वी बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा पार पडली. या सभेत अजित पवारांनी मला एकटे पाडू नका, असे भावनिक आवाहन केले. त्यांच्या या भावनिक आवाहनाबाबत बोलताना शरद पवारांनीच लोकांना अजित पवार गटाकडून धमकावले जात असल्याचा आरोप केला. त्यांच्या या आरोपांना आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवारांनी केलेले आरोप उमेश पाटील यांनी फेटाळून लावले आहेत.

याबाबत उमेश पाटील म्हणाले की, कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात असल्याचा शरद पवार साहेब यांनी केलेल्या आरोपास कसलाही आधार नसून राष्ट्रवादीची प्रतिमा मलीन करण्यासाठी त्यांनी हा आरोप केला आहे. हे आरोप राजकीय हेतून प्रेरित आहेत. त्यामुळे या आरोपांची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणीही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे.

बारामतीत आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न अजित पवारांच्या पक्षातील लोक करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही केला होता. त्यांच्या या आरोपांनाही उमेश पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उमेश पाटील यांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या आरोपांनाही प्रत्युत्तर दिले आहे. याबाबत ते म्हणाले की, अनेक वर्षांपासून पवार कुटुंबावर असलेल्या बारामतीकरांच्या प्रेमाच्या कर्जातून कधीही उतराई होता येणार नाही. पण याची जाणीव ठेवण्याऐवजी शरद पवार यांच्या बाजूने कोणी बोलले किंवा सोशल मीडियात व्यक्त झाले तर त्याला नोकरीवरून काढण्याचा आणि त्याच्यावर दादागिरी करण्याचा उद्योग मलिदा गँग करत आहे. आजवर कधी असे घडले नाही, पण विचारांच्या आणि निष्ठेच्या बाजूने असलेल्या लोकांचे रोजगार घालवले जात असतील तर अनेकांना राजकीय बेरोजगार करण्याची ताकदही याच बारामतीकरांमध्ये आहे, हे कुणाच्यातरी तालावर नाचणाऱ्या मलिदा गँगनेही लक्षात ठेवावे, असेही उमेश पाटील यांच्याकडून सांगण्यात आले आहे.