Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र माझी आतल्या गोटातली माहिती..., निवडणुकांबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य

माझी आतल्या गोटातली माहिती…, निवडणुकांबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य

Subscribe

मला एक अशी बातमी कळली आहे की, मला वाटत होतं की लोकसभा निवडणुकीला एक वर्ष राहिलं आहे. त्यामुळे पोटनिवडणूक लागणार नाही. पण बहुतेक पुण्यातील कसबा पेठ लोकसभा मतदारसंघात गिरीश बापट निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे.

लोकसभा 2024 च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडी कामाला लागले आहेत. जागा वाटपावरून पक्षांमध्ये कुरबुर असल्याचेही समोर आले आहे. या सर्व वातावरणात आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी पुण्यातील टिंबर मार्केटला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी घटनास्थळाला भेट दिली. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. ( Ajit  Pawar Ncp speaks on loksabha election in Pune visit )

पुणे टिंबर मार्केटमध्ये गोडाऊनमध्ये भीषण आग लागली होती. याचीच पाहणी करण्यासाठी अजित पवार पुण्यात गेले होते. यावेळी त्यांनी स्थानिकांचं आणि लाकूड विक्रेत्यांचं झालेलं नुकसान पाहिलं. आगीत नुकसान झालेल्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी अजित पवार यांनी यावेळी केली आहे.

- Advertisement -

अजित पवार असं म्हणाले की, मला एक अशी बातमी कळली आहे की, मला वाटत होतं की लोकसभा निवडणुकीला एक वर्ष राहिलं आहे. त्यामुळे पोटनिवडणूक लागणार नाही. पण पुण्यातील कसबा पेठ लोकसभा मतदारसंघात गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे, अशी माझी आतल्या गोटातील माहिती आहे, असं अजित पवार म्हणाले.

( हेही वाचा: लोकार्पणास विरोध करणाऱ्या विघ्नसंतोषींना जनता धडा शिकवेल; मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल )

नेतेमंडळींच्या वक्तव्याचा दर्जा खालावला

- Advertisement -

अजित पवार म्हणाले की, एकीकडे राजकीय प्रतिक्रिया देण्यास नकार देतानाच अजित पवारांनी सध्या नेतेमंडळींकडून देण्यात येत असलेल्या प्रतिक्रियांवर टीका केली. सध्या काही जण हलक्या दर्जाची विधानं करतात. दर्जाहीन वक्तव्य करतात. याचा खरंतर आपल्या सगळ्यांनीच विचार करायला हवा, असं ते म्हणाले.

राजू शेट्टींच्या विधानावर प्रतिक्रिया

राजू शेट्टी यांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याची भूमिका मांडल्यासंदर्भात अजित पवारांना विचारणा केली असता त्यांनी त्यावर सूचक विधान केलं. राजू शेट्टी म्हणाले मी स्वतंत्र उभा राहणार, 6 लोक उभे करेन. प्रत्येकजण आपापली भूमिका मांडत असतो. सगळ्यांना जे काही बोलायचंय ते बोलू द्या. निवडणुका जाहीर होऊन निर्णय होईल तेव्हाच हे सगळ स्पष्ट होईल, असं अजित पवार म्हणाले.

 

 

- Advertisment -