Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaharashtra Politics : ती परत आलीय, तोही परत येतोय..., मुख्यमंत्रिपदी फडणवीसांच्या निवडीची...

Maharashtra Politics : ती परत आलीय, तोही परत येतोय…, मुख्यमंत्रिपदी फडणवीसांच्या निवडीची शक्यता

Subscribe

विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने घवघवीत यश मिळविले आहे. सध्या मुख्यमंत्रिपदावरून चर्चा सुरू आहे. पुन्हा हे पद मिळविण्यासाठी एकनाथ शिंदे इच्छुक असल्याचे सांगण्यात येते. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज, मंगळवारी मुंबईत येत असून त्यांच्याकडून फडणवीस यांच्या नावाची घोषणा होण्याची चिन्हे आहेत.

(Maharashtra Politics) मुंबई : वादग्रस्त आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची पुन्हा एकदा राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी (25 नोव्हेंबर) रात्री उशिरा याबद्दलचे आदेश जारी करण्यात आले. तर दुसरीकडे, मुख्यमंत्रिपदासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. रश्मी शुक्ला या फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासू समजल्या जातात. (Along with Rashmi Shukla’s re-appointment, the discussion of Fadnavis’s choice for the post of CM)

कथित फॉन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्यावर काँग्रेससह सर्व विरोधकांनी आरोप केले होते. त्यांना या प्रकरणात क्लीनचिट मिळाली असून महायुती सरकारने त्यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केली होती. 30 जून 2024 रोजी निवृत्त झालेल्या शुक्ला यांना महायुती सरकारने दोन वर्षांची मुदतवाढ दिली आहे. मात्र, काँग्रेसच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालकपदावरून हटविले होते. त्या सक्तीच्या रजेवर होत्या. तर, संजयकुमार वर्मा यांची निवडणुकीच्या काळापुरती पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र, राज्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काल, सोमवारी आचारसंहिता काढण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा रश्मी शुक्ला यांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली.

- Advertisement -

हेही वाचा – Rashmi Shukla : राज्याच्या पोलीस महासंचालकपदी पुन्हा एकदा रश्मी शुक्ला

विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने घवघवीत यश मिळविले आहे. सध्या मुख्यमंत्रिपदावरून चर्चा सुरू आहे. पुन्हा हे पद मिळविण्यासाठी एकनाथ शिंदे इच्छुक असल्याचे सांगण्यात येते. शिंदे समर्थक आमदारांचीही तीच इच्छा आहे. मात्र, सर्वाधिक 132 जागा मिळविणाऱ्या भाजपा या पदावर दावा करण्याची शक्यता आहे. त्यातच काही भाजपा आमदारांनी या पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिली आहे.

- Advertisement -

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज, मंगळवारी केंद्रीय निरीक्षक म्हणून मुंबईत येत असून त्यांच्याकडून फडणवीस यांच्या नावाची घोषणा होण्याची चिन्हे आहेत. 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देवेंद्र फडणवीस यांचे ‘मी पुन्हा येईन’ हे वाक्य खूप गाजले होते. त्यामुळे आता, रश्मी शुक्ला यांच्या फेरनियुक्तीच्या निमित्ताने ‘ती परत आलीय, तोही परत येतोय…,’ अशी चर्चा समाजमाध्यमावर रंगली आहे.

हेही वाचा – Eknath Shinde : माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये, मुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -