घरमहाराष्ट्रMaharashtra Politics : अशोक चव्हाणांचा भाजपात प्रवेश; महायुतीला बळ मिळेल - देवेंद्र...

Maharashtra Politics : अशोक चव्हाणांचा भाजपात प्रवेश; महायुतीला बळ मिळेल – देवेंद्र फडणवीस

Subscribe

मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी (12 फेब्रुवारी) काँग्रेस सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांनी पक्षप्रवेश केला आहे. यावेळी अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक अमर राजूरकर यांनीही आज भाजपामध्ये प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशावेळी अशोक चव्हाण यांचे समर्थक मोठ्या संख्येने भाजपा प्रदेश कार्यालयात उपस्थित होते. (Maharashtra Politics Ashok Chavan joins BJP Mahayuti will gain strength Devendra Fadnavis)

हेही वाचा – Maharashtra Politics : अशोक चव्हाणांचा भाजपात प्रवेश; भाजपची शक्ती वाढली – देवेंद्र फडणवीस

- Advertisement -

अशोक चव्हाणांसारख्या ज्येष्ठ नेत्याच्या प्रवेशामुळे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची आणि महायुतीची शक्ती ही भक्कम झाली आहे आणि वाढली आहे. याबद्दल आमच्या कोणाच्याही मनात शंका नाही. आज आपण पाहिलं तर देशभरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रकारे भारताला विकसित करण्याचं स्वप्न पूर्णत्वाकडे नेण्याचं काम सुरू केलं. त्यानंतर जो बदल भारतामध्ये दिसायला लागलं, त्यामुळे देशभरातल्या अनेक चांगल्या नेत्यांना आपणही देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये काम करावं. मोदींसारख्या एका मजबूत नेतृत्वासोबत काम करावं. मोदींचा जो देशाला पुढे नेण्याचा जो प्रयत्न आहे, त्यामध्ये आपणही वाटा उचलावा, अशाप्रकारचा विचार हा अनेक नेत्यांमध्ये आला. त्यातले प्रमुख नेतृत्व म्हणून अशोक चव्हाणांकडे बघू शकतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा – Jalgaon : पैशांच्या देवाणघेवाणीतून आधी राडा नंतर तुफान दगडफेक; परिसराला छावणीचं स्वरुप

- Advertisement -

अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांनी एवढंच सांगितलं की, विकासाच्या मुख्य प्रवाहात योगदान देण्याची संधी मला द्या, बाकी मला कोणत्याही पदाची लालसा नाही. आम्हाला अतिशय आनंद आहे. खरंतर म्हणजे आज त्यांचा प्रवेश झाला. अमर राजूरकर यांचा प्रवेश झाला आहे. पण लवकरच हजारो कार्यकर्ते आणि नेत्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम देखील आम्ही निश्चित आयोजित करू. पण अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशामुळे येत्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात आणि विशेषत: आमच्या महायुतीला बळ मिळेल आणि त्याचा निश्चित फायदा होईल, हा आम्हाला विश्वास आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -