घर महाराष्ट्र काही ठराविक लोकांनी टार्गेट करून..; सत्यजित तांबेंचं मोठं विधान, कॉंग्रेसमध्ये परतणार?

काही ठराविक लोकांनी टार्गेट करून..; सत्यजित तांबेंचं मोठं विधान, कॉंग्रेसमध्ये परतणार?

Subscribe

नाशिक विधान परिषद निवडणुकीतील वाद अजून शांत झालेला नाही. कधीकाळी काँग्रेसमध्ये असलेले आमदार सत्यजित तांबे यांनी पुन्हा चर्चेला तोंड फोडले आहे. पक्षातील काही लोकांनी मला पक्षाच्या बाहेर काढले? असा आरोप त्यांनी केला आहे. पुणे शहरात माध्यमांशी बोलताना आमदार तांबे यांनी काँग्रेसमधील वाद आणि अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस यासंदर्भात भाष्य केलं.

नाशिक विधान परिषद निवडणुकीतील वाद अजून शांत झालेला नाही. कधीकाळी काँग्रेसमध्ये असलेले आमदार सत्यजित तांबे यांनी पुन्हा चर्चेला तोंड फोडले आहे. पक्षातील काही लोकांनी मला पक्षाच्या बाहेर काढले? असा आरोप त्यांनी केला आहे. पुणे शहरात माध्यमांशी बोलताना आमदार तांबे यांनी काँग्रेसमधील वाद आणि अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस यासंदर्भात भाष्य केलं. पुण्यातील एस एम जोशी सभागृह येथे परिवर्तन युवा परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सत्यजित तांबे हे उपस्थित होते. (Maharashtra Politics By targeting certain people Satyajit Tambe s big statement will he return to Congress)

नेमकं काय म्हणाले तांबे?

राज्यातील सध्याच्या राजकारणावर सत्यजीत तांबे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, नव्या राजकारणाची सुरूवात करण्याची आवश्यकता आहे. नवं राजकारण सुरू करताना सगळ्या युवकांनी पुढे येणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले. काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर पुढे काय याबाबत सत्यजित तांबे यांना विचारलं असता ते म्हणाले की, काँग्रेसमधल्या काही ठराविक लोकांनी टार्गेट करून मला बाहेर काढलं आहे. त्यांनी मला काँग्रेसमधून बाहेर ढकलून दिलं आहे. पण माझ्या रक्कात आणि विचारात काँग्रेस आहे. 2030 साली 100 वर्षे माझ्या कुटुंबाला काँग्रेसमध्ये येऊन पूर्ण होत आहेत. पण मला काही लोकांनी बाहेर ढकलून दिलं असेल तर ती आता पक्षश्रेष्ठींची जबाबदारी आहे की मला त्यांनी परत बोलवलं पाहिजे. अद्यापपर्यंत अशी कुठलीही हालचाल झालेली नाही, असंही तांबे यांनी सांगितलं.

- Advertisement -

तुमची काँग्रेसमध्ये जाण्याची इच्छा आहे का? यावर तांबे यांना विचारलं असता ते म्हणाले की, निवडणुकीच्या काळात जो एपिसोड झाला तो सगळ्यांच्या समोर आहे आणि कशा पद्धतीने राजकारण माझ्यासोबत झालं ते सगळ्यांना माहिती आहे. माझ्यासारखे अनेक चांगले काम करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना ठराविक नेत्यांकडून बाहेर ढकलण्यात आलं आहे. ही चिंतेची बाब आहे यावर पक्षश्रेष्ठींनी विचार करणं गरजेचं आहे, असं तांबे यांनी सांगितलं.

( हेही वाचा: Maharashtra Politics : छगन भुजबळांनी साधली वेळ; म्हणाले- मग आमचे समर्थन करा )

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -