पुणे: शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी आपली खंत बोलून दाखवली आहे. दिवाळी पहाट कार्यक्रमात चंद्रकांत मोकाटे यांनी म्हटलं की, राजकीय समीकरणे ही सर्वांसमोर ठरत नसतात, ती खासगीत ठरत असतात. तसंच ते शिवसेना, ठाकरे गट आणि भाजपची युती व्हावी, अशी इच्छाही बोलून दाखवली. (Maharashtra Politics Can t even express displeasure ex MLA of Shiv Sena expressed regret)
या कार्यक्रमाला चंद्रकांत पाटील यांनी हजेरी लावली होती आणि चंद्रकांत मोकाटे यांनी एकत्र मिसळीचा आस्वाद घेतला. चंद्रकांत मोकाटे हे शिवसेनेचे कोथरूड विधानसभेचे माजी आमदार आहेत.
मोकाटे म्हणाले की, आमच्या युतीच्या सरकारमध्ये मी पण नाराज होतो. आमच्या वहिनी पण नाराज आहेत. मला पण संधी नाही मिळाली. आमचं मन मोठं आहे, पण आम्ही नाराजी दर्शवू शकत नाही. पुण्याने खूप सोसलं आहे. अजूनही सोसायची तयारी आहे, असं म्हणत मंत्रिपद न मिळाल्याने शिवसेना आमदार चंद्रकात मोकाटे यांनी स्वत:सोबत भाजपा आमदार माधूरी मिसाळ यांनी सुद्धा खंत व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रामध्ये जे घडत आहे, ते सगळे पाहत आहेत. नेमका स्वप्नातला महाराष्ट्र आहे की कशातला आहे हे सांगता येत नाही. उद्या काय घडेल हे कोणी सांगू शकत नाही. म्हणजे उद्या परत हे आणि आम्ही एकत्र असू काय हेही आम्हाला माहिती नाही, असं मोकाटे माधुरी मिसाळ यांच्याकडे हात करत . युतीबाबत उद्देशून बोलले आहेत. त्यामुळे भविष्यात असं घडणार आहे आणि आमचा आमच्या पक्षप्रमुखांवर विश्वास आहे, असं म्हणत त्यांनी पुन्हा भाजपा आणि शिवसेना युतीची इच्छा व्यक्त केली.
तसंच, मी अजिबात नाराज नाही. पक्ष जो निर्णय घेईल त्या आदेशाचं पालन करणं हे आम्ही गेले 35 वर्षांपासून करत आहोत. त्यामुळे आम्ही नाराज नाही असे म्हणत मंत्रीपदाबाबत सुरू होणाऱ्या राजकीय चर्चांना तिथेच पूर्णविराम आमदार माधुरी मिसाळ यांनी दिला आहे.
(हेही वाचा: कदम-कीर्तिकरांच्या वादाने ओलांडल्या सर्व मर्यादा; गजाभाऊंच्या बायकोचाही उल्लेख )