Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र सत्तेसाठी राजकारण गढूळ करणाऱ्या भाजपाला महाराष्ट्र माफ करणार नाही; काँग्रेसचा हल्लाबोल

सत्तेसाठी राजकारण गढूळ करणाऱ्या भाजपाला महाराष्ट्र माफ करणार नाही; काँग्रेसचा हल्लाबोल

Subscribe

सर्वोच्च न्यायालयाने आतापर्यंत दिलेल्या निर्णयानुसार शिंदे फडणवीस सरकार हे असंविधानिक, बेकायदेशीर व अनैतिक आहे हे सिद्ध होते. सरकारने थोडीफार नैतिकता राहीली असेल तत्काळ राजीनामा दिला पाहिजे, असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. तर विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला योग्य ठरवतं, हे सरकार घटनाबाह्य असल्याने शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, असं म्हटलं आहे. यावर आता काँग्रेसचीही प्रतिक्रिया आली आहे. काँग्रेस पक्षाचे नेते सचिन सावंत यांनी सत्तेसाठी राजकारण गढूळ करणाऱ्या भाजपाला जनता माफ करणार नसल्याचं म्हटलं आहे. सचिन सावंत यांनी लागोपाठ दोन ट्वीट करत शिंदे -फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. ( Maharashtra Politics Congress leader Sachin sawant criticized Shinde Fadnavis Government over supreme court decision)

सचिन सावंत यांचं ट्वीट काय?

सर्वोच्च न्यायालयाने आतापर्यंत दिलेल्या निर्णयानुसार शिंदे फडणवीस सरकार हे असंविधानिक, बेकायदेशीर व अनैतिक आहे हे सिद्ध होते. सरकारने थोडीफार नैतिकता राहीली असेल तत्काळ राजीनामा दिला पाहिजे, असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

तसंच, अयोग्य ठरल्याने राजीनामा दिला पाहिजे. महाराष्ट्राच्या थोर राजकीय परंपरेला या सरकारच्या स्थापनेतून कलंकित करण्यात आले. तत्कालीन राज्यपाल कोश्यारी संघाचे स्वयंसेवक राहीले, राज्यपाल पदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली. सत्तेसाठी राजकारण गढूळ करणाऱ्या भाजपाला महाराष्ट्र माफ करणार नाही, असं ट्वीट सावंत यांनी केलं आहे.

शिंदे – फडणवीस सरकार घटनाबाह्य- अंबादास दानवे

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय महाराष्ट्र, देश, शिवसेना व ज्यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली आहे त्या सर्वांना दिशादर्शक देणारा आहे. प्रतोद, व्हीप आणि राजकीय पक्षाची भूमिका यावर सर्वोच्च न्यायालयाने सुस्पष्ट शिवसेना व ठाकरेंच्या बाजूने निर्णय दिला असल्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

सत्तेसाठी हापापलेल्यांचे राजकारणाची चिरफाड- उद्धव ठाकरे

एका गोष्टीचे समाधान आहे. मी वारंवार असं म्हटलं होत की, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा केवळ शिवसेनेच्या भवितव्याचा नसेल तर तो आपल्या देशातील लोकशाही जीवंत राहणार की नाही, याबद्दलचा असेल. या निकालाने एकूणच सत्तेसाठी हापापलेल्यांचे राजकारणाची चिरफाड केलेली आहे. या प्रकरणात राज्यपालांची भूमिका ही संशयास्पद नाही तर अयोग्य होती. त्यामुळे राज्यपालांच्या भूमिकेचेसुद्धा वस्त्रहरण झालेले आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

- Advertisment -