Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र 'त्यांना मी गांभीर्यानं घेत नाही'; फडणवीसांनी नाना पटोलेंच्या 'त्या' वक्तव्याचा घेतला खरपूस...

‘त्यांना मी गांभीर्यानं घेत नाही’; फडणवीसांनी नाना पटोलेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा घेतला खरपूस समाचार

Subscribe

पमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जपानवरून आल्यानंतर चांगलाच समाचार घेतला आहे. फडणवीस म्हणाले की, जगाचं लक्ष लागलेली मोहीम यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान शास्त्रज्ञांचं कौतुक करणार नाही तर कोण करणार, काँग्रेस वैफल्यग्रस्त पक्ष झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीवरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना, फडणवीस जपान दौऱ्यावर आहेत, अशी टीका त्यांनी केली होती. आता यावर पलटवार करताना फडणवीस यांनी पटोलेंचा खरपूस समाचार घेतला आहे. जपान दौऱ्यावरून मी देशासाठी, राज्यासाठी काहीतरी घेऊन आलो आहे. तसंच, पटोले महाराष्ट्रभर कशासाठी फिरत असतात, याचं उत्तर त्यांनी द्यावं, असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टोला लगावला आहे. (Maharashtra Politics Devendra Fadnavis answer to Nana Patole over Chandrayaan 3 and Phone tapping case)

चांद्रयान-3 ने लँडिंग केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दक्षिण आफ्रिकेतून ऑनलाइन सर्व शास्त्रज्ञांचं अभिनंदन करत मोहीम यशस्वी झाल्याचा आनंद व्यक्त केला. यावरून देशातील विरोधकांनी मोदींसह भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. या टीकेचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जपानवरून आल्यानंतर चांगलाच समाचार घेतला आहे. फडणवीस म्हणाले की, जगाचं लक्ष लागलेली मोहीम यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान शास्त्रज्ञांचं कौतुक करणार नाही तर कोण करणार, काँग्रेस वैफल्यग्रस्त पक्ष झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

- Advertisement -

फडणवीस पुढे म्हणाले की, जपान दौरा हा सफल झाला असून भविष्यात देशात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास सकारात्मक असल्याची माहिती दिली. तसंच, तेथील दूतावासात मराठी लोकांसोबत चांद्रयानाचं लँडिंग पाहिलं असून तो क्षण अविस्मरणीय असल्याचं सांगितलं. यावएळी विरोधकांनी मोदींवर केलेल्या टीकेबद्दल फडणवीसांना छेडलं. यावेळी त्यांनी काँग्रेसवर तीव्र शब्दात पलटवार केला.

नाना पटोलेंच्या फोन टॅपिंगच्या प्रकरणावरील टीकेवर फडणवीस म्हणाले की, मी नाना पटोलेंना कधीच गांभीर्यानं घेतलं नाही. ते सकाळी एक, दुपारी दुसरं आणि संध्याकाळी तिसरंच बोलतात. मी जपानमधून देशासाठी, राज्यासाठी काहीतरी घेऊन आलो आहे, ते राज्यभर का फिरतात हे त्यांनी सांगावं, असं म्हणत फडणवीसांनी टीकास्त्र डागलं.

- Advertisement -

( हेही वाचा: हसन मुश्रीफांच्या ‘त्या’ वक्तव्याचा शरद पवारांनी घेतला समाचार, म्हणाले – पक्षाने काय करायचे? )

- Advertisment -