Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र 'शिंदेंच्या खासदारांना भाजपच्या तिकीटावर लढायचंय'; राष्ट्रवादीचा गौप्यस्फोट

‘शिंदेंच्या खासदारांना भाजपच्या तिकीटावर लढायचंय’; राष्ट्रवादीचा गौप्यस्फोट

Subscribe

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिंदे गटातील खासदारांनी शिंदेंच्या तिकिटावर लढायचं नसल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

लोकसभा 2024 च्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. भाजप, शिंदे गट यांची महायुती यासंदर्भात बैठका घेत आहे. तर ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांची महाविकास आघाडीही कामाला लागली आहे. परंतु शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांचे खासदार, आमदार आमच्याकडे येणार असल्याचा दावा करत आहेत. यातच आता राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिंदे गटातील खासदारांनी शिंदेंच्या तिकिटावर लढायचं नसल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. ( Maharashtra Politics Eknath Shinde MPs want to fight on BJP ticket NCP leader Jayant Patil secret explosion )

( हेही वाचा: शिंदे गटाचे 22 आमदार, 9 खासदार पुन्हा उद्धव ठाकरेंकडे येणार; ठाकरे गटाच्या दाव्याने खळबळ )

काय म्हणाले जयंत पाटील?

- Advertisement -

एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या खासदारांना शिंदे गटाच्या तिकीटावर निवडणूक लढायची नाही, या खासदारांना भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढायची आहे.

शिंदे गटाची पंचाईत झाली आहे. जर खासदार भाजपच्या तिकीटावर लढले तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले शिवसैनिक मोठ्या संख्येने उद्धव ठाकरे यांच्यासोबत परत येण्याची शक्यता आहे, असे जयंत पाटील म्हणाले. जयंत पाटील यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी यांचे पुतळे हटवणे ही चिंतेची बाब

- Advertisement -

कर्तृत्ववान महिलांचे पुतळे ठेवायचेच नाही ही भूमिका ठेवून हा कार्यक्रम झाला. त्यामुळे या महिलांबाबत सरकारच्या मनात काय भूमिका आहे हे महाराष्ट्राला कळले आहे असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे. महाराष्ट्र सदनामध्ये झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील दोन कर्तबगार भगिनी सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा बाजूला करण्यात आला आणि वीर सावरकरांचा पुतळा ठेवून कार्यक्रम करण्यात आला. सावरकरांचा कार्यक्रम करायला कुणाचा विरोध नाही परंतु त्याठिकाणी सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे दिसता कामा नये एवढा द्वेष का ? असा संतप्त सवालही जयंत पाटील यांनी केला.

 

- Advertisment -