घरमहाराष्ट्रमंत्रिमंडळ विस्ताराआधीच बच्चू कडू झाले 'मंत्री'; नेमकं प्रकरण काय?

मंत्रिमंडळ विस्ताराआधीच बच्चू कडू झाले ‘मंत्री’; नेमकं प्रकरण काय?

Subscribe

दिव्यांग कल्याण खात्याचे अभियान दिव्यांगांपर्यंत पोहोचवण्यासाठी बच्चू कडू यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. बच्चू कडू यांची दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगांच्या दारी या अभियानाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.

आमदार बच्चू कडू यांना अखेर मंत्री पदाचा दर्जा जाहीर झाला आहे. दिव्यांग कल्याण खात्याचे अभियान दिव्यांगांपर्यंत पोहोचवण्यासाठी बच्चू कडू यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. बच्चू कडू यांची दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगांच्या दारी या अभियानाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. ( Maharashtra Politics Even before the cabinet expansion Bacchu Kadu became Minister What exactly is the case )

बच्चू कडू यांनी अनेकदा जाहीरपणे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत वक्तव्य केलं होतं. मंत्रीपदाबाबत ते उत्सुक असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. आता त्यांची हीच नाराजी दूर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडू यांना दिव्यांग कल्याण खात्याचं अध्यक्षपद देत, त्याला मंत्रि‍पदाचा दर्जा असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता बच्चू कडू यांना मंत्रीपद मिळणार नाही हे निश्चित झालं. आता यावर बच्चू कडू काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

- Advertisement -

( हेही वाचा: ‘तो’ व्हिडीओ पाहून राज ठाकरे झाले भावूक; म्हणाले, “माहीत नाही, कोणीतरी विष कालवलं की…” )

काय म्हणाले होते बच्चू कडू?

मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने जनतेची कामं खोळंबली असल्याचं बच्चू कडू म्हणाले होते. मंत्रिमंडळ विस्तार हा मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला व्हायला हवा. एकाच मंत्र्यांकडे अनेक खाती आहेत. मोठी अडचण निर्माण होत आहे. कामाला गती मिळत नाही. जनतेची कामे वेगाने करायची असतील तर विस्तार हा महत्त्वाचा आहे. जनतेच्या हिशोबाने विस्तार होणं गरजेचं आहे. येत्या निवडणुकीत त्याचा परिणाम होऊ शकतो.

- Advertisement -

तसचं, मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास त्यात तुम्ही कोणतं खातं मागितलं आहे, असं विचारलं असता दिव्यांग मंत्रालय मागितलं असून ते मिळेल असं वाटतयं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची शब्द दिला असल्याचेही बच्चू कडू याआधी प्रतिक्रिया देताना म्हणाले होते.

मंत्रिमंडळ विस्तार लवकरच

मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. कोर्टाचे जे काही अडथळे होते ते दूर झालेले आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करतील, असा विश्वास शंभुराज देसाई यांनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -