घरमहाराष्ट्रMaharashtra politics : पाच दिवसांचा सिलसिला जारी... भाजपाच्या जाळ्यात दोन बडे नेते!

Maharashtra politics : पाच दिवसांचा सिलसिला जारी… भाजपाच्या जाळ्यात दोन बडे नेते!

Subscribe

मुंबई : पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा देऊन अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला धक्का दिला. त्यांनी आता भाजपात प्रवेश केला आहे. वास्तविक त्यांच्या भाजपाप्रवेशाची चर्चा यापूर्वीच रंगली होती. पण अचानक सोमवारी त्यांनी सर्वांनाच धक्का दिला. केंद्र सरकारकडून भ्रष्टाचाराचे एखादे प्रकरण काढल्यानंतर लगेच पाच दिवसांत विरोधी पक्षांतील दोन बडे नेते भाजपाच्या गळाला लागल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा – Ashok Chavan: अशोक चव्हाणांचा भाजपात प्रवेश; म्हणाले, ही नवी सुरुवात

- Advertisement -

राज्यात जून 2022मध्ये सत्तांतर झाल्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली होती. विधानसभेत 4 जुलै 2022 रोजी झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या बहुमत चाचणीला अशोक चव्हाण वेळेत पोहोचले नव्हते. तेव्हाच ते सत्तेत सहभागी होतात की काय, असे तर्क लढविले गेले. मात्र, आम्ही महाविकास आघाडीसोबतच असल्याचे अशोक चव्हाण यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. तरीही, महामोर्चात अनुपस्थित, महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदांना दांडी आदी विविध कारणांमुळे अशोक चव्हाण लवकरच भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरू राहिली आणि त्यांनी ती शक्यता फेटाळल्यानंतर चर्चेला पूर्णविराम मिळाला.

पण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 8 फेब्रुवारी 2024 रोजी संसदेत श्वेतपत्रिका सादर केली. या श्वेतपत्रिकेत 2014पूर्वीच्या काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळातील आर्थिक स्थितीचा उल्लेख करण्यात आला आहे. या काळात आर्थिक व्‍यवस्‍थापनात पूर्णपणे अपयशी ठरल्याने देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. या सरकारने घेतलेल्या निर्णयांनी देशाला पिछाडीवर नेल्याचा ठपका ठेवतानाच त्यावेळी झालेल्या मोठ्या घोटाळ्यांची यादीच दिली आहे. या यादीत ‘आदर्श सोसायटी’ घोटाळ्याचा उल्लेख असून त्यात अशोक चव्हाण यांचेही नाव आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Politics : अशोक चव्हाणांचा भाजपात प्रवेश; महायुतीला बळ मिळेल – देवेंद्र फडणवीस

आदर्श हाऊसिंग सोसायटी घोटाळ्यात अशोक चव्हाण यांना क्लीनचिट मिळाली असली तरीही हा घोटाळा उजेडात आल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले होते. त्यामुळे भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने श्वेतपत्रिकेत त्याचा उल्लेख करून अशोक चव्हाण यांना छेडले आहे. विशेष म्हणजे, हा उल्लेख होऊन अवघे पाच दिवस होत नाहीत तोच, काँग्रेसची साथ सोडत अशोक चव्हाण हे 13 फेब्रुवारी रोजी थेट भाजपामध्ये दाखल झाले.

सुमारे सात महिन्यांपूर्वी देखील असेच घडले होते. भोपाळमध्ये 27 जून 2023 रोजी झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांची आघाडी असलेल्या ‘इंडिया’वर टीका करताना प्रत्येक पक्ष घोटाळेबाज असल्याची टीका केली होती. त्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने 70 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पाच दिवसांनी, 2 जुलै 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले.

हेही वाचा – Sanjay Raut : भाजपाने काँग्रेसचे शुद्धीकरण सुरू केले – संजय राऊत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -