घर महाराष्ट्र ब्राह्मणांचा इतका द्वेष मग फडणवीसांसोबत सत्तेत का? काँग्रेसचा खोचक सवाल

ब्राह्मणांचा इतका द्वेष मग फडणवीसांसोबत सत्तेत का? काँग्रेसचा खोचक सवाल

Subscribe

काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. छगन भुजबळ यांना ब्राह्मणांचा एवढा द्वेष होता तर देवेंद्र फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत कसे बसलात, असा खोचक सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी ब्राह्मण समाजामधील नावांबाबत केलेल्या विधानामुळे सध्या राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. आता भुजबळ यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. छगन भुजबळ यांना ब्राह्मणांचा एवढा द्वेष होता तर देवेंद्र फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत कसे बसलात, असा खोचक सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. (Maharashtra Politics in Marathi chhagan Bhujbal has so much brahmin hatred then why did you come to power with devendra Fadnavis congress Kakasaheb Kulkarni Question)

काय म्हणाले काकासाहेब कुलकर्णी?

काकासाहेब कुलकर्णी म्हणाले की, छगन भुजबळ हा महाराष्ट्राच्या राजकारणातला कमी बुद्धीचा माणूस आहे. ज्या सावित्रीबाई फुले आणि ज्योतीराव फुले यांची नावं घेऊन त्यांनी राजकारण केलं. त्याचं साहित्यही छगन भुजबळ यांनी वाचलेला नाही. त्यांच्या नावे चुकीचा इतिहास भुजबळ सांगत आहेत. सावित्री फुले यांनी एक पुस्तक लिहिलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे, काव्यफुले, या पुस्तकात त्यांनी शाळेला सरस्वतीचा दरबार म्हटलं आहे. छगन भुजबळ हे नाकारणार आहेत का? त्यांचा अभ्यास किती? डिग्री किती याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. छगन भुजबळ हे सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांचं साहित्य नाकारण्याचं पाप भुजबळ करत आहेत मी त्यांचा धिक्कार करतो, असं कुलकर्णी म्हणाले.

- Advertisement -

त्या पुस्तकाच्या पहिल्या पानावरचं शंकर पार्वतीचा फोटो आहे. सावित्रीबाई फुले यांनी शंकरावर कविता केली आहे. त्यांचा फुले कुटुंबियांबातचा अभ्यास कमी आहे. तसाच त्यांचा ब्राह्मण समाजाबाबतचा अभ्यासही कमी आहे. तसंच यावेळी त्यांनी एक प्रश्नही उपस्थित केला. छगन भुजबळ यांना ब्राह्मणांचा एवढा द्वेष होता तर देवेंद्र फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून कसे बसलात. आपण त्या ठिकाणी बोलायला पाहिजे होतं देवेंद्रजी आपण ब्राह्मण आहात मी तुमच्या शेजारी बसणार नाही. परंतु दुर्दैवानं सत्तेसमरो ते लाचार आहेत. भुजबळांना महाराष्ट्रातील सर्वीत कमी बुद्धीचा माणून, कमी शैक्षणिक पात्रतेचा माणूस म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, असंही कुलकर्णी यांनी यावेळी नमूद केलं.

( हेही वाचा: ‘गर्दीत ये तुला कायमचं संपवतो’; नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी, तपास सुरू )

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -